खास वैशिष्ट्ये असलेले iphones, ipads, Macbooks, AirPods सह असंख्य इलेक्ट्रिक उत्पादने बाजारात आणून Apple कंपनी ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कंपन्यांपैकी एक बनली आहे. आता Apple कंपनी इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च करण्याच्या योजनेवर काम करत आहे. असा विश्वास आहे की 2024 पर्यंत Apple ची इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होईल. विशेष गोष्ट अशी आहे की Apple स्मार्टफोन प्रोसेसर प्रमाणेच स्वत: च्या इलेक्ट्रिक कारसाठी खास बॅटरी तंत्रज्ञान विकसित करीत आहे, जे कमी खर्चात उत्तम मायलेज देऊ शकेल.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, Apple सेल्फ ड्रायव्हिंग कार बनविण्याच्या योजनेवर काम करीत आहे, जे फ्यूचर मोबिलिटीचे उदाहरण ठरू शकते. Apple च्या आगामी इलेक्ट्रिक कारची बातमी अमेरिकन कंपनी टेस्लासाठी मोठी स्पर्धा ठरली आहे. कारण दोन्ही कंपन्या त्यांच्या प्रीमियम उत्पादनांसाठी परिचित आहेत. आता येणारा काळच सांगेल की, Apple ची इलेक्ट्रिक कार लूक, फीचर्स, पॉवर आणि बॅटरीबाबत त्याच्या प्रतिस्पर्ध्यांशी किती स्पर्धा करेल.
कंपनी 2014 पासून प्रोजेक्ट टायटनच्या नावाने वाहन क्षेत्रात प्रवेश करण्याचे काम करत आहे. तेव्हा कंपनीने आपल्या वाहनाचे डिझाइन तयार केले होते. परंतु नंतर कंपनीने एक पाऊल मागे येत आपले लक्ष सॉफ्टवेअरवर केंद्रित केले. 2018 मध्ये, Apple चे माजी कर्मचारी डॉग फील्ड हा ऑटो प्रकल्प पाहण्यासाठी कंपनीकडे परत आले. त्यावेळी ते टेस्ला इंक येथे कार्यरत होते. वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, आता कंपनीचे लक्ष्य ग्राहकांसाठी उपयुक्त वाहन बनवणे हे आहे. Apple ने अद्याप आपली योजना सार्वजनिक केलेली नाही. (हेही वाचा: Honda च्या नव्या क्रुजर बाईकसाठी Down Payment शिवाय घरी आणता येणार, कंपनीकडून EMI चा ऑप्शन उपलब्ध)
Apple ची रणनीती मुळात नवीन बॅटरी डिझाइन करणे आहे, ज्यामुळे बॅटरीची किंमत लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि वाहनाचे ऑपरेटिंग तास वाढतील. अशाप्रकारे स्मार्टफोन विश्वात दबदबा निर्माण केल्यानंतर आता Apple कंपनी ऑटो क्षेत्रात आपेल पाय रोवत आहे.