Tesla (Photo Credits-Twitter)

Tesla Model 3 Spied: भारतात टेस्लाच्या आगमाची जोरदार सध्या चर्चा सुरु आहे. लोक टेस्लाच्या ईवी ची अत्यंत प्रतीक्षा करत आहेत. ही प्रतीक्षा अपेक्षेपेक्षा अधिक होत चालली आहे. असे सांगण्यात येत आहे की, जगातील सर्वाधिक मोठी इलेक्ट्रिक कार निर्माती टेस्ला आपली Model 3 कार सर्वात प्रथम देशात लॉन्च करणार आहे. सध्या या कारचे काही फोटो सुद्धा इंटरनेटवर पहायला मिळत आहेत. त्यामुळे अंदाज लावला जाऊ शकतो की, कंपनी लवकरच ती भारतात लॉन्च करु शकते.(Mercedes-Maybach GLS600 भारतात लॉन्च, किंमत 2.43 कोटी रुपयांपासून सुरु)

इंस्टाग्रामवर एका कारचा कंपनीकडून स्पाय फोटोंच्या नुसार पुण्यातील रस्त्यांवर लाल रंगाच्या नंबर प्लेटसह ही कार टेस्टिंगवेळी दिसून आली आहे. दिसलेली कार गडद निळ्या रंगाची Tesla Model 3 असून त्यावर अस्थायी लायलेन्स प्लेट लावण्यात आली आहे. असे मानले जात आहे की, या कारची टेस्टिंग सध्या ARAI द्वारे केली जात आहे. कारण भारतात कोणतीही कार लॉन्च होण्यापूर्वी त्याला ARAI च्या चाचणीला सामोरे जावे लागते. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच ते वाहन भारतीय रस्त्यांवर उतरवली जाते. ही कार जागतिक स्तरावर तीन वेरिएंट स्टँडर्ड रेंज, लॉन्ग रेंज आणि परफॉर्मेन्स मध्ये उपलब्ध आहे.(Yamaha FZ-X भारतात लॉन्चिंगसाठी तयार, हायटेक फिचर्ससह जाणून घ्या किंमती बद्दल अधिक)

टेस्लाची Model 3 जागतिक बाजारात टेस्लाची सर्वाधिक विक्री करण्यात येणारी कार होण्यासह सर्वाधिक स्वस्त कार सुद्धा आहे. कंपनीने आतापर्यंत अधिकृत आधारावर टेस्ला मॉडेल 3 ची किंमतीबद्दल खुलासा केलेला नाही. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार कार 60 लाख रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्याची शक्यता आहे.