जर्मनीची आलिशान वाहन निर्माती कंपनी मर्सिडीज यांनी भारतात आज आपली अल्ट्रा लक्झरी एसयुवी Maybach GL600 ही 2.43 कोटी रुपयांना लॉन्च केली आहे. तर ही कार मर्सिडीज मेबैक लाइनअपमध्ये ब्रँन्डची पहिली एसयुवी असून जी यापूर्वी 2019 मध्ये जागतिक स्तरावर झळकवण्यात आली होती. दरम्यान, काही आंतरराष्ट्रीय बाजारात ही कार विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. त्यानंतर आता भारतात लॉन्च केली आहे. (Ducati Multistrada 950 S 'GP White' भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)
भारतात ही कार लॉन्च केली असून याला शानदार क्रोम फिनिश दिले आहे. या अल्ट्रा-लक्झरी एसयुवीमध्ये कारच्या स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत काही बदल केले आहेत. GLS600 मेबॅक मध्ये क्रोमपेक्षा कमी काही ट्रिम पार्ट आहेत. यामध्ये मोठे वर्टिकल स्लेट, ग्रिल विंडो लाइन, साइड-स्टेप, फ्रंट आणि रियर बंपरवर डिझाइन एक्सेंट, रुफ रेल आणि एग्झॉस्ट टिप्सचा समावेश आहे. या प्रीमियम लक्झरी SUV मध्ये मोठे 22 इंच किंवा 23 इंचा ब्रश असणारे मल्टी स्पोक व्हिल्स, एक ड्युअल टोन पेंट स्किमचा समावेश आहे.
Mercedes-Maybach GLS600 लग्झरी प्रीमियम एसयुवी कंपनीची स्टँडर्ड एसयुवीच्या तुलनेत अल्ट्रा लक्झरी आहे. हेच कारण आहे की, मेबॅक जीएसएल 600 ची किंमत स्टँडर्ड जीएसएल एसयुवी पेक्षा अधिक आहे. मेबॅक जीएसएलची अधिक किंमतीमागील आणखी एक कारण म्हणजे ती सीबीयूच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. यामुळेच किंमतीत वाढ झाली आहे. मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 लँड रोव्हर रेंज रोव्हर, बेंटले बेंटायगा, सेल्स-रॉयस कलिनन सारख्या प्रतिस्पर्ध्यांसाठी उतरवली आहे.(सिंगल चार्जमध्ये 130KM ची जबरदस्त रेंज देणार EeVe Soul इलेक्ट्रित स्कूटर, पहा कधी होणार लॉन्च)
Mercedes-Maybach GLS600 मध्ये 4.0 लीटरचे V8 इंजिन दिले आहे. जे अधिकाधिक 550bhp ची पॉवर आणि 730Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. या इंजिनमध्ये एक EQ बूस्ट स्टार्टर जनरेटर सुद्धा असणार आहे. जो 21bhp आणि 249Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. GL600 या इंजिनला 9G-Tronic ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडला जाणार आहे. स्पीड बद्दल बोलायचे झाल्यास मेबॅक 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेगाने धावणार आहे. याची टॉप स्पीड 250 किमी प्रती तास असणार आहे.