Ducati Multistrada 950 S 'GP White' भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स
Ducati Multistrada 950 S GP White (Photo Credits-Twitter)

Ducati कंपनीने भारतात आपली Multistrada 950 S 'GP White' लॉन्च केली आहे. ही मोटरसायकल बाजारात 15.69 लाख रुपये (एक्स-शोरुम) किंमतीत उतरवण्यात आली आहे. डुकाटी मल्टीस्ट्राडा 950 एस टॉप स्पेक मॉजेल असून ज्यामध्ये ग्राहकांना उत्तम फिचर्स दिले जाणार आहेत. बाइकच्या इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 937 cc चे द्विन इंजिन दिले जाणार आहे. जे लिक्विड कूल्ड असणार आहे. हे इंजिन 9,000rpm वर 111bhp छी मॅक्सिमम पॉवर आणि 7750 rpm वर 96 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह जोडण्यासह यामध्ये क्विक शिफ्टर सुद्धा दिला गेला आहे. या मोटरसायकलचा कर्ब वेट 230 kg आहे.

जसे आम्ही तुम्हाला सांगितले की, Multistrada 950 S टॉप स्पेक मॉडेल असून जी उत्तम फिचर्ससह बाजारात उपलब्ध होणार आहे. या बाइकमध्ये दिलेल्या फिचर्ससाठी डुकाटी क्विक शिफ्ट अप अॅन्ड डाउन (DQS), डुकाटी कॉर्नरिंग लाइट्ससह फुल LED हेडलाइट्स, क्रुज कंट्रोल, 5 इंचाचा फुल कलर TFT डिस्प्ले, डुकाटी स्काईहुक सस्पेंशन Evo (DSS) सह इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन, हँड्स फ्री सिस्टिम, बॅकलिट हँडलबार कंट्रोल्स Bosch चे कॉर्नरिंग अॅन्टीलॉक ब्रेकिंग सिस्टिम दिले आहेत.(सिंगल चार्जमध्ये 130KM ची जबरदस्त रेंज देणार EeVe Soul इलेक्ट्रित स्कूटर, पहा कधी होणार लॉन्च)

या बाइकच्या अन्य काही फिचर्स बद्दल सांगायचे झाल्यास यामधअये ग्राहकांना फोर रायडिंग मोड्स दिले गेले आहेत. ज्यामध्ये स्पोर्ट्स, टूरिंग, अर्बन आणि एंड्युरो याचा समावेश आहे. ऐवढेच नाही तर नव्या ग्राहकांना स्पोक व्हिल्स आणि अलॉय व्हिल्स ऑप्शन निवडण्यास दिला आहे. डुकाटी मल्टीस्ट्राडा 950 ची टक्कर थेट Triumph Tiger 900 GT आणि BMW F 900 XR सोबत होणार आहे.