Yamaha FZ-X (Photo Credits-Twitter)

Yamaha India लवकरच भारतात आपली नवी नियो-रेट्रो स्टाइल मोटरसायकल FZ-X लॉन्च करणार आहे. ही मोटरसायकल टेस्टिंग दरम्यान खुप वेळा दिसून आली आहे. नुकत्याच कंपनीकडून असे सांगण्यात आले की, 18 जून रोजी ही मोटरसायकल लॉन्च केली जाणार आहे. माहितीनुसार, निवडक डिलशिपवर याची आधीपासूनच बुकिंग सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना बुकिंगसाठी 1 हजार ते 5 हजार रुपये टोकन द्यावे लागत आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोटरसायकलची बुकिंगसाठी जी टोकन घेतली जात आहे ती FZ आणि FZS बाइकच्या नावावर रजिस्टर केली जात आहे. त्यानंतर ते नवी FZ-X साठी कन्वर्ट केले जाणार आहे. याची एक्स शोरुम किंमत 1.15 लाख रुपये असणार आहे. मोटरसायकलची डिलिव्हरी ऑगस्ट पासून केली जाणार आहे.(Mercedes-Maybach GLS600 भारतात लॉन्च, किंमत 2.43 कोटी रुपयांपासून सुरु)

Tweet:

इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना एक नवी 149cc एअर कूल्ड इंजिन दिले जाणार आहे. हे इंजिन 12.4bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 13.3mm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. हे इंजिन 5 स्पीड कॉन्सटेंट मॅश ट्रान्समिशनला जोडले जाणार आहे.(2021 Ducati Panigale V4 भारतात लॉन्च, दमदार इंजिनसह मिळणार 'हे' खास फिचर्स)

मोटरसायकच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, मोनोशॉक रियर सस्पेंशन ऑफर केले जाऊ शकते. त्याचसोबत मोटरसायकलमध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प दिले आहे. सर्कुलर स्पलिट LED डे टाइन रनिंग लाइट, पिलियन ग्रॅब रेल दिला गेला आहे. असे मानले जात आहे की, यामध्ये ब्लूटूथ, अँन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम सारखे हायटेक फिचर्स दिले जाऊ शकतात. याची लांबी 2020mm, रुंदी 785mm आणि उंची 1115mm आहे.