2021 Ducati Panigale V4 भारतात लॉन्च, दमदार इंजिनसह मिळणार 'हे' खास फिचर्स
2021 Ducati Panigale V4 (Photo Credits-Twitter)

Ducati Panigale V4: डुकाटी इंडिया यांनी भारतात आपली Ducati Panigale V4 स्पोर्ट्स बाइक लॉन्च केली आहे. अत्यंत आकर्षक या स्पोर्ट्स बाइकची किंमत 23.40 लाख रुपये आहे. दरम्यान, Panigale V4 च्या हाय ट्रिम S ची किंमत 28.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाइकला गेल्या वर्षात एक मोठे अपडेट दिले होते. खासियत म्हणजे 2020 मॉडेल सुद्धा भारतीय बाजारात अधिकृतरित्या लॉन्च करण्यात आली नव्हती. या ऐवजी काही निवडक युनिट्स विशेष मागणीसाठी ग्राहकांना उपलब्ध करुन दिले होते.

डुकाटीच्या या प्रमुख स्पोर्ट्स बाइकसाठी एक नवे मॉडेल BS6 1103cc V4 डेस्मोसेडिसी स्ट्रॅडेल इंजिन लैस आहे. हे इंजिन 13000 आरपीएमवर 211 बीएचपीची पॉवर आणि 9500 आरपीएम वर 124 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. हे इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशनसह येणार आहे. नव्या Ducati Panigale V4 च्या इलेक्ट्रॉनिक्स पॅकेजमध्ये ABS कॉर्नरिंग EVO, DTC EVO 3, DSC, DWC EVO, DPL, DQS EVO 2, EBC EVO, DES EVO आणि न्यू रायडिंग मोड स्ट्रॅटेजींचा समावेश आहे.(धमाकेदार फिचर्ससह लवकरच लॉन्च होणार Royal Enfield ची नवी मोटरसायकल, स्मार्टफोनला ही कनेक्ट करता येणार)

नव्या जनरेशनची Panigale V4 ही दोन वेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. त्यामध्ये स्टँडर्ड डुकाटी पॅनिगेल वी4 ची किंमत 23.50 लाख रुपये आणि हाय स्पेक डुकाटी पॅनिगेल वी4 एस ची किंमत 28.40 लाख रुपये आहे. या दोन्ही मॉडेलमध्ये सुरक्षिततेसाठी चेन गार्ड फिन खासकरुन दिले आहेत. तसेच स्लाइडच्या स्थितीत चेन आणि क्राउनसह धोकादायक दुर्घटनांपासून बचाव करण्यास मदत करणार आहेत. या बाइकची बुकिंग संपूर्ण भारतात डुकाटी डीलरशिपवर सुरु करण्यात आली आहे.