अमेरिकेतील मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला यांची सर्वाधिक वेगवान कार Tesla Model S Plaid ची डिलिव्हरी पुढील महिन्या पासून सुरु होणार आहे. याबद्दल कार निर्मात्या कंपनीचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी एक ट्विट करत माहिती दिली आहे. एलन मस्क यांनी ट्विट करत असे म्हटले की, या फ्लॅगशिप सेडान कारची डिलिव्हरी येत्या 3 जून पासून सुरु होणार आहे. दरम्यान टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार आपल्या वेगवान इलेक्ट्रिक कारसाठी प्रसिद्ध आहे.(Automatic Hybrid Tractor: भारतामध्ये Proxecto ने सादर केला देशातील पहिला ऑटोमॅटिक हायब्रिड ट्रॅक्टर; ना गियर ना क्लच, जाणून घ्या वैशिष्ठ्ये आणि किंमत)
Tesla Model S Plaid ची आतापर्यंतची ही सर्वाधिक वेगवान कार आहे. याच्या वेगाबद्दल बोलायचे झाल्यास ती 100 किमी प्रति तास स्पीड पकडू शकते. याचे दोन मॉडेल लॉन्च केले जाणार असून Model S Plaid त्या 1.9 सेकंदात 100 किमी प्रति तास वेग पकडण्यास सक्षम आहे. यामधील पहिली कार फेब्रुवारी मध्ये डिलिव्हरी होणार होती. पण चिपच्या कमी मुळे याचे लॉन्चिंग इव्हेंट पुढे वाढवण्यात आली. परंतु आता कंपनी याच्या डिलिव्हरी इव्हेंटचे आयोजन येत्या 3 जूनला कॅलिफोर्नियातील कंपनी फॅक्ट्रीमध्ये केली जाणार आहे.
पहिल्या मॉडेलच्या Long Range वेरियंटमध्ये कंपनीने डुअल मोटर फिट केली आहे. जो 670bhp ची पॉवर जनरेट करता येणार आहे. Model S चे हे वेरियंट 3.1 सेकंदात 100 किमी प्रति तास वेग पकडण्यास सक्षम आहे. तर सिंगल चार्जमध्ये ही कार 663 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज पकडणार आहे. हे वेरियंट 1.9 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग पडकण्यास सक्षम असून सिंगल चार्जमध्ये कार 627 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देणार आहे. याची टॉप स्पीड 321 किमी प्रति तास आहे.(Audi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील या कारची किंमत 112,990 डॉलर ठरवण्यात आली आहे. यामध्ये कंपनीने हाय परफॉर्मेन्स मोटर्सचा वापर केला आहे. जो कॉर्बन स्लीव्ह रोटर्ससह येणार आहे. दरम्यान, टेस्लाने या वर्षी भारतात प्रवेश केला आहे. कंपनीने आपले पहिले प्लांट बंगळुरु मध्ये सुरु केले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कंपनी भारतात सर्वाधिक प्रथम आपली पॉप्युलर सेडान कार मॉडेल 3 लॉन्च करणार आहे. तर कंपनी आपली 2021 च्या मिड मध्ये आपली कार लॉन्च करणार होती. परंतु कोविड19 आणि काही कारणांमुळे त्याचे लॉन्चिंग पुढे ढकलू शकतात.