![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/05/HAV_Tractors_for_life_-_Price_Revealed_GWX3sWL-380x214.jpg)
भारतीय बाजारात Proxecto ने देशातील पहिला ऑटोमॅटिक हायब्रिड ट्रॅक्टर (Automatic Hybrid Tractor) लाँच केला आहे. एचएव्ही एस 1 (HAV S) असे या ट्रॅक्टरचे नाव आहे. या ट्रॅक्टरमध्ये अॅडव्हान्स फीचर आणि सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरले गेले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या हायब्रीड ट्रॅक्टरमध्ये 12 पेक्षा जास्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी अशा विभागामध्ये पहिल्यांदाच दिसणार आहे. अशाप्रकारे भारतातील शेतावर ऑटोमॅटिक ट्रॅक्टर चालण्यास सज्ज झाला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये हे एचएव्ही ट्रॅक्टर प्रथम अॅग्रीटेक कार्यक्रमात जगासमोर सादर केला गेला होता. हा कार्यक्रम जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आला होता.
बॅटरी पॅक नसलेला असा पहिला ट्रॅक्टर आहे जो भारतात लाँच केला गेला आहे. या ट्रॅक्टरमध्ये विशेष इको फ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. Proxecto इंजीनियरिंग सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि एचएव्ही ट्रॅक्टरचे संस्थापक अंकित त्यागी म्हणाले की, या ट्रॅक्टरला परदेशातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना साथीच्या रोगामुळे मॅन पॉवर, सप्लाय चेन, लॉजिस्टिक्स, डीलर्स आणि सप्लायर्स अशा अनेक मुद्द्यांना तोंड द्यावे लागले. या सर्व अडचणी असूनही आम्ही हा ट्रॅक्टर बाजारात आणण्यात यशस्वी ठरलो आहोत.
देशातील हा असा पहिला ट्रॅक्टर आहे जो पूर्णपणे स्वयंचलित आहे. या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने ऑल व्हील इलेक्ट्रिक ड्राइव्ह (AWED) तंत्रज्ञान वापरले आहे. ट्रॅक्टरमध्ये गियर आणि क्लच दिले नाहीत. ड्राईव्हिंग सुलभ करण्यासाठी फॉरवर्ड, न्यूट्रल आणि रिव्हर्स अशा 3 सोप्या पद्धती दिल्या आहेत. कंपनीने या ट्रॅक्टरची दोन मॉडेल्स सादर केली आहेत. त्यांचे 50 एस 1 डिझेल संकरित मॉडेल पारंपारिक ट्रॅक्टरच्या तुलनेत 28 टक्के विजेची बचत करते. यासह 50 एस 2 सीएनजी संकरित मॉडेल पारंपारिक ट्रॅक्टरच्या तुलनेत जवळपास 50 टक्के इंधन वाचवते. (हेही वाचा: Mahindra नंतर आता Tata कारच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या अधिक
या ट्रॅक्टरमध्ये कंपनी 10 वर्षाची संपूर्ण वॉरंटी देत आहे. या ट्रॅक्टरचे बेस व्हेरिएंट, HAV S1 50HP ची सुरूवात किंमत 9.49 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचे टॉप व्हेरिएंट S1+ ची किंमत 11.99 लाख रुपये ठेवली गेली आहे. कंपनीने या ट्रॅक्टरचे S1 45 HP मॉडेल देखील सादर केले आहेत, ज्याची किंमत 8.49 लाख रुपये आहे.