Audi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Audi Q4 e-tron (PC - Twitter)

Audi Electric Car: जर्मन वाहन निर्माता कंपनी ऑडीने आपली Q4 e-tron आणि Q4 e-tron Sportback कार सादर केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर केल्या होत्या. या कार या वर्षाच्या अखेरीस युरोपियन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. कंपनीने Q4 ई-ट्रॉन आणि Q4 ई-ट्रॉन स्पोर्टबॅक Q4 35 e-tron, Q4 40 e-tron आणि Q4 50 e-tron Quattro या तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये एंट्री-लेव्हल Q4 35 e-tron मध्ये 52 kWh बॅटरी पॅक वापरला गेला आहे. जी 310 एनएम टॉर्कसह 168 बीएचपीची पावर देते.

तसेच Q4 40 e-tron मध्ये 77 केडब्ल्यूएचची बॅटरी पॅक आहे. जो 310 मिमी टॉर्कसह 201 बीएचपीची पावर देतो. तसेच Q4 50 e-tron Quattro मध्ये 77 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो 295 बीएचपी पॉवर आणि 460 एनएम टॉर्क जनरेट करतो. (वाचा - नवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट)

ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचं झालं तर, ऑडीने त्याचे बेस व्हेरियंट Q4 35 ई-ट्रॉन 341 किमी ड्राईव्हिंग रेंज देते, तर Q4 40 ई-ट्रॉन आणि Q4 50 ई-ट्रॉनमध्ये अनुक्रमे 520 किमी ते 497 किमी ची ड्राईव्हिंग रेज देण्यात आली आहे. कारच्या रेंज-टॉपिंग व्हेरिएंटला 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग गती निश्चित करण्यासाठी 6.2 सेकंद लागतात, तर त्याची टॉप स्पीड 180kph आहे.

दरम्यान, ऑडी Q4 ई-ट्रॉन काही महिन्यांत युरोपमध्ये दाखल होणार आहे. सध्या जर्मनीत या कारची किंमत सुमारे 38 लाख रुपयांपासून सुरू होईल. तथापि या किंमतीत सध्या कोणताही कर समाविष्ट केलेला नाही.