दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) यांनी भारतात टाटा Altroz XM+ वेरियंट 6.6 लाखात लॉन्च केली आहे. तर सध्या ही कार फक्त पेट्रोल वेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. टाटा अल्ट्रोज एक्सएम प्लस वेरियंट उत्तम फिचर्ससह लॉन्च केला आहे. जी ग्राहकांना अधिक पसंद पडणार आहे. नव्या अल्ट्रोज एक्सएम प्लसची खासियत बद्दल येथे अधिक जाणून घ्या.(Tata Harrier Camo Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमत)
या वेरियंटची डिलिवर येत्या 2020 पासून सुरु केली जाऊ शकते. XM+ वेरियंटच्या नव्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये अॅन्ड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले सोबत 7-इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टिम, 16 इंचाचा स्टील व्हिल्स कवर्स, वॉइस रिकग्नीशन, स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, की लेस एन्ट्री यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कारमध्ये ड्राइव्ह मोड्स, पॉवर विंडो, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ABS आणि EBD सह रियर पार्किंग सेंसर सुद्धा दिले आहे.
इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 1.2 लीटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन किंवा 1.5 लीटर डिझेल इंजिन दिले जाते. याचे डिझेल इंजिन 90 बीएचपीची कमीतकमी पॉवर आणि 200 न्यूटन मीटरचे पीक टॉर्क जनरेट करणार आहे. तर पेट्रोल इंजिन 85 बीएचपीची पॉवर आणि 114 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करणार आहे. दोन्ही इंजिन मध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिले आहेत.(Honda Civic Petrol वर दिला जातोय 1 लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफरबद्दल अधिक)
दरम्यान, टाटा अल्ट्रोज कंपनीच्या ALFA प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या कारणास्तवच त्याला अधिक मजबूती मिळते. तर Tata Altroz ला GNCAP क्रेश टेस्टमध्ये अडल्ट सेफ्टीसाठी 5 स्टार रेटिंग मिळाली आहे.