Honda Civic Petrol वर दिला जातोय 1 लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफरबद्दल अधिक
Honda (Photo Credits-twitter)

भारतात Honda Civic ही प्रिमीयम सेडान फार पॉप्युलर आहे. फेस्टिव्ह सीजनच्या सुरुवातीला भारतात या कारवर जबरदस्त डिस्काउंट देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर Honda Cars India या कारवर लाखो रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. अशातच जर तुम्ही नवी कोरी गाडी सणासुदीच्या काळात खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आम्ही तुम्हाला या कारची खासियत आणि यावर देण्यात येणाऱ्या डिस्काउंट बद्दल अधिक माहिती देणार आहोत.(Car Subscription Service: महाराष्ट्रातील 'या' शहरामध्ये Maruti Suzuki ने सुरु केली कार सबस्क्रिप्शन सेवा; जाणून घ्या काय आहे योजना)

कारच्या पॉवर आणि इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास Honda Civic मध्ये पेट्रोल आणि डिझेल या मध्ये दोन्ही इंजिन ऑप्शन मिळणार आहे. पेट्रोल वर्जनमध्ये 1.8 लीटर i-VTEC इंजिन दिले गेले आहे. जे CVT ऑटोमेटिक गिअरबॉक्स मध्ये जोडले गेले आहे. तसेच 6500rpm वर 139bhp ची पॉवर 4300rpm वर 174Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. मायलेज संदर्भात कंपनीने असा दावा केला आहे की, याचे पेट्रोल मॉडेल 16.5kmp चे मायलेज देते.(कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास 5 लाखांहून कमी किंमती मधील 'या' हॅचबॅक गाड्यांबद्दल जरुर जाणून घ्या)

ऑफर्सबद्दल सांगायचे झाल्यास कंपनी या कारवर कमीतकमी 2.50 लाखापर्यंक डिस्काउंट ऑफर करत आहे. या डिस्काउंटमध्ये पेट्रोल इंजिन मॉडेलवर पूर्णपणे 1 लाख कॅश डिस्काउंट दिला जाणार आहे. तर डिझेलच्या सर्व मॉडेल्सवर 2.50 लखांचा कॅश डिस्काउंट ऑफर केला जात आहे. ही ऑफर संपूर्ण फेस्टिव्ह सीजन मध्ये सुरु राहणार आहे. अर्बन परिसरात ड्रायव्हिंग करणाऱ्या बहुतांश लोक सिविकच्या पेट्रोल मॉडेलला अधिक पसंदी देतात. कारण ही अधिक पॉवरफुल आहे. अशातच जर तुम्ही पेट्रोल मॉडेल पसंद करत असल्यास तुम्हाला 1 लाखांचा कॅश डिस्काउंट दिला जाणार आहे.