Shocking! पुण्यात Ola Electric Scooter ने अचानक घेतला पेट; कारण अस्पष्ट, कंपनीने दिले चौकशीचे आदेश (Watch Video)
Ola Electric Scooter (संग्रहित संपादित प्रतिमा)

ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) ने Ola S1 आणि Ola S1 Pro या दोन स्कूटर भारतात लॉन्च केल्या आहेत. Ola S1 Pro ही स्कूटर खास फीचर्ससह सादर केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ओलाच्या स्कूटरबाबत चर्चा सुरु आहे. अशात भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक दुचाकी ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये Ola S1 Pro पेट घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील लोहगाव भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

या 31 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एका वर्दळीच्या परिसरात उभ्या असलेल्या ओलाच्या स्कूटरमधून अचानक ज्वाळा निघताना दिसत आहेत. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्कूटरमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा दावा केला जात आहे. स्कूटरमध्ये वापरण्यात आलेल्या लिथियम आयन बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

लिथियम-आयन बॅटरीमधील आग विझवणे कठीण आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यावर ते लगेच हायड्रोजन वायू आणि लिथियम-हायड्रॉक्साइड तयार करते. यामुळे त्याचे आणखी ज्वलनशील हायड्रोजन वायूमध्ये रूपांतर होते. Ola S1 मध्ये 2.97kWh बॅटरी आहे, तर S1 Pro मध्ये 3.98kWh बॅटरी आह्जे. आगीचे कारण काहीही असो मात्र इलेक्ट्रिक स्कूटरला अशा प्रकारे आग लागणे ही नक्कीच भीतीदायक घटना आहे. यामुळे भविष्यात ही गाडी विकत घेणाऱ्या लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. (हेही वाचा: देशातील पहिली हायड्रोजन कार झाली लाँच; एकदा टाकी भरली की धावणार तब्बल 650 किमी)

या घटनेनंतर ओला इलेक्ट्रिकने शनिवारी सांगितले की, ते त्यांच्या स्कूटरला लागलेल्या आगीच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. कंपनीने सांगितले की, आगीचे कारण तात्काळ समजू शकले नाही आणि ही घटना घडलेल्या पुण्यात एक टीम पाठवली आहे. कंपनी आग लागलेल्या स्कूटरच्या मालकाच्या संपर्कात आहे व ही घटना गांभीर्याने घेतली जात आहे. याबाबत योग्य ती कारवाई करू आणि येत्या काही दिवसांत अधिक माहिती देऊ. ओला इलेक्ट्रिकने जुलै 2021 मध्ये दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या होत्या. यादरम्यान कंपनीला अवघ्या 24 तासांत 1 लाख ऑर्डर्स मिळाल्या होत्या.