Porsche Taycan (Photo Credits-Twitter)

Porsche कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट कार Taycan सप्टेंबर महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र सप्टेंबर पूर्वीच ही कार लॉन्च केली जाईल असे काही जणांचे म्हणणे आहे. कंपनीकडून अद्याप या कारच्या फायनल डिझाईनबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही.

Porsche Taycan खरेदी करण्याची जगभरातील 20 हजार लोकांची इच्छा आहे. कंपनीने ही स्पोर्ट कार 2019 Geneva Motor show मध्ये झळकवली होती. तसेच युरोप येथे सध्या ग्राहकांकडून कार खरेदी करण्याबाबत रजिस्ट्रेशन सुरु आहे. या स्पोर्टकारसाठी 2 पर्मनंट एक्साइडेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटार असण्याची शक्यता आहे. तर इंजिनसाठी 600bhp ची मॅक्सिमम पावर जनरेट करु शकणार आहे. या कारमध्ये देण्यात आलेल्या लिथियम-ऑयन बॅटरी हाय वोल्टेज 500kms पेक्षा जास्त रेंज देणारी आहे.(हेही वाचा-जिनेवा मोटार शो मध्ये दिसली Jesko ची शानदार कार, जाणून घ्या खासियत)

Porsche Taycan इलेक्ट्रिक कार फक्त 3.5 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रति तास वेगाने पल्ला पार करणार आहे.NEDC च्या अनुसार रेंज 500 किलोमीटर पेक्षा जास्त असणार आहे. तर फक्त 4 मिनटांच्या चार्जिंगवर 100 किलोमीटर पर्यंतचे अंतर पार करु शकणार आहे.