(Photo Credit: Twitter)

भारतात येणारी पुढील काही महिने ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अत्यंत खास आहे. कारण यामध्ये काही उत्तम इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्यात येणार आहेत. त्यामध्ये हायरेंज असणारे इलेक्ट्रिक स्कूटर्सचा सुद्धा समावेश आहे. ही स्कूटर भारतात सध्या मिळणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स पेक्षा अधिक हायटेक असणार आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कूटर बद्दल अधिक माहिती देणार आहोत जी लवकच भारतातील रस्तांवर दिसून येणार आहे. तर Ola Electric Scooter च्या लॉन्चिंग बद्दल खुप चर्चा होती, काही महिन्यांपूर्वी कंपनीने याची पहिली झलक सुद्धा दाखवली होती. ही स्कूटर भारतात असलेल्या बजाज चेतक आणि टीवीएस आयक्यूब यांना टक्कर देणार आहे. मात्र याच्या लॉन्चिंग बद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, या वर्षाच्या अखेर पर्यंत ही भारतात उतरवली जाऊ शकते.

सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर मर्यादितच अंतर कापण्यास सक्षम आहेत. परंतु ओला इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना दुप्पट रेंज देण्यास सक्षम असणार आहे. याची खासितय म्हणजे ही स्कूटर लांब रेंज पर्यंत चालवण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी चार्ज करावी लागणार नाही आहे. काही दिवसांपूर्वी ओलाने Etergo ला टेकओव्हर केले आहे. त्यानंतर कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन येणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या स्कूटरमध्ये स्वॅपेबल हाय एनर्जी डेंसिटी बॅटरीचा वापर केला आहे.(MG Motors ची सेल्फ ड्रायव्हिंग SUV Gloster महागली, जाणून घ्या नव्या किंमतीबद्दल अधिक)

ओला कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर हायरेंज देण्यास सक्षम असणारच आहे. यामागे काही खास तंत्रज्ञानाचा हात आहे. खरंतर स्कूटरमध्ये डिटॅचेबल किंवा स्वॅपेबल बॅटरी लावली आहे. त्यामुळे डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्हाला दुसरी बॅटरी लावता येणार आहे. या स्कूटरची रेंज सिंगल चार्जमध्ये जवळजवळ 240 किमी असू शकतो. अशातच जर तुम्ही घरीच एक बॅटरी चार्ज करुन ठेवली असेल तर डिस्चार्ज बॅटरीच्या जागी तु्म्ही ही बॅटरी लावल्यास रेंज दुप्पट होणार आहे. यासाठी फक्त 5 मिनिटे लागणार आहेत.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना यामध्ये एक मोठे स्टोरेज बूट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, TFT इंस्ट्रुमेंट क्लस्ट्र दिले जाऊ शकते. तसेच काही अन्य हायटेक फिचर्स सुद्धा या स्कूटरमध्ये मिळण्याची अपेक्षा आहे.