MG Motors ची सेल्फ ड्रायव्हिंग SUV Gloster महागली, जाणून घ्या नव्या किंमतीबद्दल अधिक
MG Gloster SUV (Photo Credits-Twitter)

एमजी मोटर्सकडून आपली ऑटोनॉमस एसयुवी एमजी ग्लोस्टरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ही देशातील पहिलीच सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे. परंतु आता याच्या किंमतीत 80 हजार रुपयांनी वाढ केली आहे. एमजी हेक्टर कंपनीची ही कार जवळजवळ 28.98 लाख रुपयांना लॉन्च केली होती. मात्र ग्राहकांना किंमत वाढल्यानंतर त्यासाठी 29.98 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. या कारचे बेस मॉडेल महाग झालेले नाही. पण अन्य मॉडेल्सच्या किंमती 50 ते 80 हजार रुपयांनी वाढल्या आहेत.

MG Gloster च्या टॉप-अॅन्ड मॉडेलची किंमत 36.68 लाख रुपये आहे. तर एमजी ग्लोस्टर स्मार्ट 6 सीटरची किंमत 31.98 लाख रुपये आहे. 7 सीटर शार्प आणि 6 सीटर शार्पची किंमत आता 35.58 लाख रुपये झाली आहे. Gloster च्या टॉप स्पेक वेरियंट एमजी ग्लोस्टर सैवी-6 सीटची किंमत आता 36.88 लाख रुपये, एक्स शोरुम किंमत असून त्यात 80 हजार रुपयांची वाढ झाली आहे.डायमेंन्शन बद्दल बोलायचे झाल्यास याची लांबी 4985 मिलीमीटर, रुंगी 1926 मिलीमीटर आणि उंची 1867 मिलीमीटर आहे. याचे व्हिलबेस जवळजवळ 3 मीटर आहे. यामध्ये 19 इंचाचे अलॉय व्हिल्स दिले गेले आहेत.(मारुती सुजुकीने मिनी ट्रकमध्ये आणले 'हे' जबरदस्त फिचर, पार्किंग करणे होणार सोप्पे)

कंपनीने या कारमध्ये दोन इंजिन ऑप्शन दिले आहेत. ज्यामध्ये पहिला 1996cc टर्बो डिझेल इंजिन आहे. तो 4000Rpm वर 163 PS ची पॉवर आणि 1500-2400 Rpm वर 375Nm टॉर्क जनरेट करणार आहे. तर ट्रान्समिशनसाठी हे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स लैस आहे. हे इंजिन 2 व्हिल ड्राइव्ह आहे. यामध्ये दुसरा 1996cc चे डिझेल द्विन टर्बो इंजिन दिले आहे. जे 4000Rpm वर 218 PS ची पॉवर आणि 1500-2400 Rpm वर 480 Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. तर ट्रान्समिशनसाठी हे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स लैस आहे. हे इंजिन 4 व्हिल ड्राइव्ह आहे.

कारमध्ये 12.3 इंचाचा इंन्फोटेन्मेंट सिस्टिम, iSmart 2.0 तंत्रज्ञान,12 स्पीकर सिस्टिम, 64 एम्बियंट लाइटिंग, 8 इंचाचा डिजी एनॉलॉग ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, पॅनारोमिक सनरुफ आणि मीडिल कॅप्टन सीट सारखे फिचर्स दिले आहेत. ही एसयुवी 70 हून अधिक कार कनेक्टेड फिचर्स लैस आहे. सेफ्टी फिचर्ससाठी डुअल फ्रंट एअरबॅग्स, साइड आणि फुल लैंग्थ कर्टेन एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम. हिल डिसेंट कंट्रोल, एन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, ईबीडी आणि ब्रेक एसिस्ट रोल मुव्हमेंट इंटरवेशन, हिल होल्ड कंट्रोल सारखे सेफ्टी फिचर्स दिले आहेत.