मारुती सुजुकीने मिनी ट्रकमध्ये आणले 'हे' जबरदस्त फिचर, पार्किंग करणे होणार सोप्पे
Maruti Suzuki logo (Photo Credits: Wikimedia Commons)

मारुती सुजुकीने (Maruti Suzuki) लाइट कमर्शिअल व्हिएअल Super Carry ला रिवर्स पार्किंग असिस्ट सिस्टिमसह अपडेट केले आहे. त्यामुळे आता ती पार्क करणे अत्यंत सोपे आणि सुरक्षित होणार आहे. रिवर्स पार्किंग असिस्ट सिस्टम कारमध्ये दिला जातो. त्याच्या मदतीने कार ड्रायव्हर अत्यंत मुश्किल पार्किंग सुद्धा सहज करतो. अशातच जे लोक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास त्यांना आता अधिक सवलत मिळणार आहे.(2021 Kia Seltos आणि Sonet Facelift SUV भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

जर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये एक रेग्युलेटरी फायलिंग बद्दल बोलायचे झाल्यास नव्या रिवर्स पार्किंग असिस्टंट सिस्टिम फिचर वाहनांचे स्टंडर्ड फिचरच्या आधारावर ग्राहकांना वाहनात ऑफर केले जाणार आहे. म्हणजेच वाहनाचे कोणतेही मॉडेल खरेदी केल्यास ग्राहकांना हे फिचर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. वाहनात उत्तम सेफ्टी फिचर संबंधित याच्या किंमतीत सुद्धा वाढ होणार आहे.त्यानंतर Super Carry खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 18 हजार रुपये भरावे लागणार आहेत.(Audi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

2021 Super Carry च्या नव्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना आता 4.48 लाख रुपये ते 5.56 लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे. या किंमती 30 एप्रिल पासून वाहनांवर लागू करण्यात आली आहे.आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये Maruti Suzuki India कडून असे सांगण्यात आले आहे की, तुमच्या माहितीसाठी Super Carry च्या सर्व वेरियंट्सला RPAS सिस्टिमच्या नव्या वेरियंट्समध्ये अपडेट करण्यात येणार आहे. या वाहनाची बदलेली किंमत दिल्लीत लागू होणार आहे.