Nissan Kicks SUV चा पहिला लूक ; लवकरच होणार भारतात लॉन्च
निस्सान किक्स SUV

निस्सान इंडियाने SUV चे बहुप्रतिक्षित अपडेटेड मॉडेलचे भारतात अनावरण केले. जपानच्या कारमेकरने हे नवे मॉडेल भारतात सादर केले आहे. जगभरात चांगला खप झाल्यानंतर निस्सानने हे मॉडेल भारतीय बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

SUV किक्सचे डिझाईन अतिशय आकर्षक आणि प्रभावी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ही कार नव्या पीढीतील साहसी लोकांसाठी अतिशय योग्य आहे.

काळ्या रंगाच्या पिलर्ससह फ्लोटिंग रुफ डिझाईन, स्टायलिश रुफ रेल, सिग्नेचर एलईडी डीआरएल, शार्क फिन अँटेना, फ्रंट फॉग लॅम्प्स आणि इंडिकेटर्ससहीत डोअर माऊंडेट ओआरव्हीएस हे फिचर्स देण्यात आलेले आहे.

हेडलॅम्प्स, टेड लाईट्स आणि आयकॉनिक बुमरँग आकाराच्या एलईडी सिग्नेचर लॅम्पमुळे कारचे सौंदर्यात अधिक भर पडते. आर 17 आणि 5 स्पोक मशिन्ड अलॉय व्हिलमुळे कारचा दमदार आणि व्हिल ओरिएंटेड स्टान्सला बळकटी मिळते.