नवी Ford Ecosport ऑक्टोंबर मध्ये होऊ शकते लॉन्च, पहायला मिळणार काही खास बदल
Ford EcoSport Representative Image (Photo Credit: NetCarShow)

अमेरिकेतील वाहन निर्माता कंपनी फोर्ड काही काळापासून देशात अपडेटेड ईकोस्पोर्टची टेस्टिंग करत आहे. दम्यान, ऑटोमेकरकडून ती कधी लॉन्च केली जाणार याबद्दल स्पष्ट केलेले नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवी 2021 फोर्ड इकोस्पोर्ट फेसलिफ्ट ऑक्टोंबर महिन्याच्या अखेर पर्यंत शोरुममध्ये येण्याची शक्यता आहे. कंपनीची ही पॉपुलर कॉम्पॅक्ट SUV च्या डिझाइनमध्ये काही बदल आणि अपग्रेटेड गोष्टी मिळणार आहेत. फेसलिफ्टट इकोस्पोर्ट सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक महाग असू शकतो. ज्याची किंमत 8.19 लाख रुपये ते 11.69 लाख रुपयादरम्यान असू शकते.

रिपोर्टनुसार समोर आलेल्या स्पाय इमेजच्या माध्यमातून कळते की, नवी फोर्ड इकोस्पोर्ट 2021 मध्ये काही विशिष्ट बदल केले जाणार आहेत. यामध्ये एल आकाराचे एलईडी डीआरएल, खालील बाजूस फॉक्स स्किड प्लोटसह अपडेटेड फ्रंट बंपर आणि संशोधित फॉग लॅम्प असेंबली याच्या पोर्टफोलिओमध्ये आणि सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अतिरिक्त अंतर निर्माण करणार आहे. हेडलॅम्प युनिट, ओआरवीएम, अलॉय व्हिल्स आणि एलईडी टेललॅम्पमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑटोमेकर फेसलिफ्टेड इकोस्पोर्ट मॉडेल लाइनअप मध्ये एक नवा कलर ऑप्शन देऊ शकते. (Kia Seltos X Line: किआ कंपनीची लवकरच एक दमदार कार बाजारात होणार दाखल, जाणून घ्या कारची वैशिष्ट्ये)

केबिनमध्ये कमीतकमी बदल केले जातील. नव्या 2021 फोर्ड इकोस्पोर्ट फेसलिफ्टमध्ये नवीन सीट अपहोल्स्ट्री, अपडेटेड कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि Apple Care Play सह अॅन्ड्रॉइड कनेक्टिव्हिटी असणारे अपग्रेड केलेली एसवायएनसी 3 इन्फोटेनमेंट सिस्टम दिसू शकते. EcoSport चे फेसलिफ्ट पाच ट्रिम्समध्ये दिले जात राहतील - Ambiente, Trend, Trend+, Titanium आणि Titanium+. टॉप-एंड टायटॅनियम ट्रिममध्ये 6 एअरबॅग, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, रिव्हर्सिंग कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, क्रूज कंट्रोल अॅडजस्टेबल स्पीड-लिमिटींग डिव्हाइस, मागील बाजूस इसोफिक्स चाइल्ड सीट माउंट, इल्युमिनेटेड ग्लोब बॉक्स, स्वयंचलित वायपर आणि पॅडल शिफ्टर्स (फक्त एटी ) सारखे फिचर्स मिळू शकतात.

इंजिन आणि पॉवरच्या बाबतीत, नवीन फोर्ड इकोस्पोर्ट 2021 सध्याच्या व्हेरिएंटप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध केले जाईल. पेट्रोल आवृत्तीमध्ये, हे 1.5L, 3-सिलेंडर युनिट असेल जे 120bhp पॉवर आणि 149Nm टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे. त्याच वेळी, त्याचे डिझेल व्हेरिएंट 1.5L इंजिनसह देखील येते, जे 99bhp पॉवर आणि 215Nm टॉर्क देण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी, या मध्ये दोन गिअरबॉक्स असतील-5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक फक्त पेट्रोल व्हेरिएंटवर उपलब्ध असतील.