Maruti swift limited edition (Photo Credits-Twitter)

Maruti Swift Special Edition: देशातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी मारुती सुजुकीने भारतात त्यांची लोकप्रिय कार स्विफ्टचे लिमिटेड अॅडिशन लॉन्च केले आहे. ज्यामध्ये कंपनीने डिझाइनसह कॅबिनमध्ये कॉस्मेटिक अपडेट केले आहे. स्विफ्टचे लिमिटेड अॅडिशन सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक वेगळे आहे, यामध्ये ऑल-ब्लॅक कलर थीमचा प्रयोग केला आहे.

नव्या लिमिटेड अॅडिशनची किंमत यापूर्वीच्या मॉडेलपेक्षा जवळजवळ 24 हजार रुपयांनी अधिक आहे. सध्या स्विफ्टची किंमत 5.19 लाखांपासून सुरु होते. नव्या मॉडेलमध्ये एरोडायनामिक स्पॉयलर आणि बॉडी-साइड मोल्डिंग व्यतिरिक्त ग्रिल, टेल लॅम्प आणि फॉग लॅम्पवर ऑल- ब्लॅक गार्निश मिळणार आहे. आतील बाजूस स्पोर्टी सीट कवरसह आधीपासून असलेले गोल डायल आणि फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हिल दिले गेले आहेत.(Maruti Brezza आणि Hyundai Venue ला टक्कर देण्यासाठी येणार Citroen ची नवी कार, जाणून घ्या अधिक)

मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शशांक श्रीवास्तव यांनी असे म्हटले की, स्विफ्ट जवळजवळ 14 वर्षांपासून भारतीय रस्त्यांवर धावत आहे. ही मारुती सुजुकीची एक यशस्वी आणि महत्वपूर्ण मॉडेल ठरली आहे. कंपनीने आता या कारला अधिक स्पोर्टी लूक देत वाहनाची लोकप्रियता अधिक वाढवण्याचा विचार केला आहे.(Maruti S-cross चे कंपनीने लॉन्च केले लिमिटेड Addition, किंमत 8.56 लाख रुपये)

Maruti Swift सध्या चार वेरियंट्स म्हणजेच L,V,Z आणि Z+ मध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये BS6 1.2 लीटर पेट्रोल युनिटचा वापर केला गेला आहे. जो 83PS ची पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या मोटारसह 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सचे ऑप्शन मिळणार आहे. तर मायलेज बद्दल बोलायचे झाल्यास स्विफ्टचे पेट्रोल वेरियंट 21.21kmpl चे मायलेज देणार आहे.