Maruti कडून आपल्या CNG कारच्या किंमतीत जबरदस्त वाढ
Maruti Suzuki (Photo Credits-Twitter)

देशातील सर्वाधिक मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुजुकी इंडिया (Maruti Suzuki India) यांच्याकडून हॅचबॅक स्विफ्ट आणि अन्य मॉडेलच्या सीएनजी वेरियंटच्या किंमतीत 15 हजार रुपयांनी वाढ केली आहे. कंपनीचे नियामक फाइलिंग मध्ये असे म्हटले आहे की, स्विफ्ट आणि सर्व सीएनजीवेरियंटच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. या नव्या किंमती 12 जुलै पासून लागू करण्यात आल्या आहेत.(Mahindra XUV 700 पहिल्यांदाच जबरदस्त स्मार्ट फिचरसह लवकरच होणार लॉन्च)

मारुती सुजुकी ऑल्टो, सेलेरियो, एस-प्रेसो, वॅगनआर, ईको आणि अर्टिगासह आपल्या काही मॉडेलमध्ये सीएनजी वेरिटंची विक्री केली जाते. ज्याची किंमत 4.43 लाख रुपये ते 9.36 लाख रुपयांपर्यंत आहे. तर या वर्षात एप्रिल महिन्यात कंपनीने सेलेरियो आणि स्विफ्ट सोडून आपल्या बहुतांश मॉडेलच्या किंमतीत 22,5000 रुपयांची वाढ केली होती. सुजुकी व्यतिरिक्त अन्य काही कार निर्मात्यांचा एकूण खर्च वाढल्याने त्यांनी गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. किंमतीत करण्यात आलेली वाढ ही सेलवर सुद्धा जरुर प्रभाव टाकू शकणार आहे. कारण लॉकडाउनचे निर्बंध शिथील केल्यानंतर ऑटो क्षेत्रात विक्री वाढू लागली आहे.

तर मारुती सुजुकीने नुकतीच आपली 2021 Maruti Suzuki Swift लॉन्च केली होती. याचे डिझाइन आणि अपडेटेड फिचर्स ग्राहकांना अत्यंत पसंद आले होते. मात्र आता कंपनीने पुन्हा एकदा या कारचे नेक्स्ट जेनरेशन मॉडेल लॉन्च करण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. या मॉडेलसाठी सर्व अपडेट फिचर्स देत ती मार्केटमध्ये उतरवली जाणार आहे.(Driving License ते Registration ची वैधता आता 30 सप्टेंबर पर्यंत ग्राह्य; MoRTH ची ट्वीट करत माहिती)

नेक्स्ट जनरेशन Maruti Swift ही हर्टेक्ट प्लॅटफॉर्म वर तयार केली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर आधी कंपनीने सुजुकी एस-प्रेसो तयार करण्यासाठी केला होता. या प्लॅटफॉर्मची सर्वाधिक मोठी खासियत अशी की, याचे वजन अत्यंत कमी असणार आहे. त्याचसोबत हँडलिंग सुद्दा अत्यंत सोप्पे होऊन जाते. ऐवढेच नव्हे तर या प्लॅटफॉर्मच्या कारणामुळे मायलेज अत्यंत अधिक वाढते. अशातच ग्राहकांना नेक्स्ट जेनरेशन स्विफ्ट चालवताना उत्तम अनुभव मिळणार आहे.