Driving License ते Registration ची वैधता आता 30 सप्टेंबर पर्यंत ग्राह्य; MoRTH ची ट्वीट करत माहिती
Representational Image | Driving (Photo Credits: Unsplash)

केंद्र सरकार कडून वाहन धारकांना अजून एक दिलासादायक बातमी दिली आहे. आता वाहनधारकांना ड्रायव्हिंग लाससन्स (Driving License) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (Registration Certificate) सह परमीट्सला 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सध्या कोरोना संकटामुळे या कागदपत्रांच्या व्हॅलिडिटी साठी यापूर्वी 30 जून ही अंतिम मुदत होती पण आता पुन्हा त्यामध्ये 30 सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. The Ministry of Road, Transport and Highways कडून याविषयी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. नक्की वाचा: आता वाहन परवानासाठी RTO मध्ये ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही; पहा काय आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवा नियम.

दरम्यान आता वाहन चालकांची जी सारी डॉक्युमेंट्स 1 फेब्रुवारी 2020 पासून एक्सपायर झाल्या आहेत किंवा 30 सप्टेंबर 2021 एक्झपायर झाल्या असतील त्यांना आता हा नवा नियम फायदा देणार आहे. सध्या कोरोना परिस्थिती पाहता केंद्र सरकारकडून या नियमांची अंमलबजावणी करण्याची सूचना राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिली आहे.

ट्वीट

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर कडे आता आरटीओ मध्ये ड्राईव्हिंग टेस्ट न देता लायसंस देण्यासाठीचे अधिकार दिले आहे. MoRTH च्या माहितीनुसार, त्यांची टेस्ट पास करणार्‍यांना आता ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची आणि आरटीओ मध्ये फेर्‍या मारण्याचा त्रास कमी होणार आहे.