Mahindra XUV 700 पहिल्यांदाच जबरदस्त स्मार्ट फिचरसह लवकरच होणार लॉन्च
Mahindra XUV (Photo Credits: Twitter)

स्वदेशी कार निर्माती कंपनी लवकरच आपली नवी कार एसयुवी महिंद्रा एक्सयुवी 700 (Mahindra XUV 700) लॉन्च करणार आहे. ही कार कंपनी 75th स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लॉन्च केली जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून या कारचा व्हिडिओ टीझर लॉन्च करण्यात आला आहे. त्यात असे दिसून येते की, स्मार्ट डोअर हँडल आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही कार अनलॉक करु शकता किंवा अटोमॅटिकली पॉप आउट करु शकता. याच्या चावीने सुद्धा ती अनलॉक करता येणार आहे. ऐवढेच नव्हे तर या कारच्या दरवाज्यावर लावण्यात आलेल्या सेंसर टचने सुद्धा अनलॉक केली जाऊ शकते.

यापूर्वी कंपनीने गेल्या वर्षात आपली पॉप्युलर ऑफरोडर महिंद्रा थार ही 15 ऑगस्ट 2020 रोजी लॉन्च केली होती. आता एक्सयुवी 700 सह कंपनी असेच काही करण्याची तयारी करत आहे. लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार, या कारमध्ये कंपनी पर्सनलाइज्ड सेल्फी अलर्ट फिचर सुद्धा देत आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पीड लिमिट पेक्षा अधिक वेगाने ड्राइव्ह करात तेव्हा कार तुम्हाला पर्सनलाइज्ड ऑडिओ सेफ्टी अलर्ट मेसेज देणार आहे.(5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करा 'या' शानदार गाड्या, 1 लीटर पेट्रोलमध्ये कापणार 22km चे अंतर)

महिंद्रा एक्सयुवी 700 ची टक्कर Tata Safar, MG Hector Plus आणि Hyundai Alcazar सारख्या कार सोबत होणार आहे. या कारच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास याची किंमत 15 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स आणि अॅडवान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टिम सारखे फिचर्स दिले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त उत्तम सुरक्षिततेसाठी कंपनी यामध्ये 6 एअरबॅग्स, ABS सह EBD, ISOFIX चाइल्ड सीट माउंटसह 4 डिस्क ब्रेक देऊ शकते.