महिंद्रा एक्सयुव्ही 300 (Mahindra XUV 300) ही नवीकोरी कार 14 फेब्रुवारीला लॉन्च होत असून 9 फेब्रुवारीपासून तिचे बुकींग सुरु झाले आहे. कार लॉन्च होण्यापूर्वीच तब्बल 4 हजार बुकींग्स झाल्या आहेत. तुम्ही देखील नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया या दमदार कारचे फिचर्स... (फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होतील 'या' दमदार कार्स!)
XUV 300 माइलेज:
एक्सयूव्ही 300 कारच्या पेट्रोल वेरिएंटचे मायलेज 17 किलोमीटर प्रती लीटर आहे. तर डिझेल वेरिएंटचा मायलेज 20 किलोमीटर प्रती लीटर आहे.
XUV 300 इंजिन
महिंद्रा एक्सयूव्ही 300 यात दोन इंजिनचे पर्याय आहेत. यात एक 1.5 लीटर डिझेल इंजिन असेल. ज्यात 117 हॉर्सपावरची क्षमता असेल. यात इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत असेल. तर दुसरे 110 हॉर्सपावर क्षमता असलेले 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये ड्युअल जोन क्लाईमेट कंट्रोल, फ्रंट पार्किंग सेंसर, स्टीअरिंग मोड इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारची लांबी 3,995 एमएम आहे. ही कार मारुति सुजुकी विटारा ब्रेजा, टाटा नेक्सन, फोर्ड ईकोस्पोर्ट आणि हुंडई क्रेटा या कार्संना टक्कर देईल. मात्र या दमदार कारची किंमत किती असेल याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. तरी या कारची किंमत 8 ते 12 लाख रुपये असेल असा अंदाज लावला जात आहे.