फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होतील 'या' दमदार कार्स!
Cars Launch in Feb 2019 (Photo Credit- File)

नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. यंदा अनेक कार कंपन्या नवनवे मॉडल्स लॉन्च करत आहेत. त्यामुळे यात तुम्हाला तुमच्या बजेटची एखादी कार मिळू शकते. या महिन्यात लॉन्च होणाऱ्या या कार्सवर एक नजर टाकूया.... Maruti Baleno Facelift 2019 भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

होन्डा सिव्हिक (Honda Civic)

या कारचे मॉडल आणि लूक पूर्वीच्या मॉडलपेक्षा खूप वेगळा आहे. ही कार 1.8 मीटर आणि 2 लीटर इंजिनसह बाजारात सादर करण्यात आली आहे.

ऑडी A8L (Audi A8L)

या महिन्यात लॉन्च होणाऱ्या कार्सपैकी ही सर्वात महागडी कार असू शकते. Audi A8 L ला देखील इतर कार्सप्रमाणे डिझेल आणि पेट्रोल हे दोन्ही पर्याय दिले आहेत. दोन्ही वेरिएंटमध्ये 3.0 लीटरचे इंजिन असू शकते. याशिवाय यात 4.0 लीटर इंजिनचा पर्यायही देण्यात आला आहे.

महिंद्रा XUV 300 (Mahindra XUV 30)

हे महिंद्राचे सर्वात कॉम्पॅक्ट मॉडल असून 14 फेब्रुवारीला XUV 300 ते लॉन्चिंग होईल. डिझेल, पेट्रोल या दोन्ही इंजिनांसह ही कार बाजारात लॉन्च करण्यात येईल. याशिवाय कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेंटमेंट सिस्टम, पुश स्टार्ट-स्टॉप बटण या सुविधा देण्यात आल्या आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये 7 एअरबॅग्स देण्यात आले आहेत. त्यामुळे कार अधिक खास आणि सुरक्षित होईल.

जीप कॉम्पस ट्रेल हॉक (Jeep Compress)

जीप Compass रेंज अंतर्गत ऑफ रोड Trail Hawk व्हर्जन या महिन्यात लॉन्च करेल. रिपोर्ट्सनुसार, ही कार फक्त डिझेल AT सेटअपमध्ये उपलब्ध असेल. यात 2.0 लीटर डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे.