Mahindra च्या स्वस्त SUV's दिला जातोय बंपर डिस्काउंट, जाणून घ्या अधिक
Mahindra XUV 300 (Photo: Mahindra Website)

दिवाळीचे दिवस जवळ आले असून ऑटोमोबाइक कंपन्या याचे औचित्य साधत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी डिस्काउंट ऑफर्स घेऊन आले आहेत. तर महिंद्रा आणि महिंद्रा (Mahidra and Mahindra) यांची फुल साइज एसयुवी ते एन्ट्री लेव्हल SUV's वर बंपर डिस्काउंट देत आहे. खरंतर गेल्या काही महिन्यात सातत्याने कंपनीचा सेल डाऊन झाल्याचे दिसुन आले आहे. याच कारणास्तव आता फेस्टिव्ह सीजनमध्ये कार खरेदीवर सूट दिली जात आहे.(Tata Harrier Camo Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमत)

भारतात Mahindra XUV300 एक अत्यंत पॉप्युलर सब-कॉम्पेक्ट एसयुवी असून त्याची थेट टक्कर टोयोटा अर्बन क्रुजर, ह्युंदाई क्रेटा आणि किआ सॉनेट सारख्या कारसोबत होणार आहे. Mahindra 7.95 लाख रुपयांच्या सुरुवाती किंमतीवर पूर्णपणे 30 हजार रुपयांचा बंपर डिस्काउंट ऑफर दिला जाणार आहे. ज्यामध्ये 25 हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि 5 हजारांचा कॉर्पोरेटचा लाभ मिळणार आहे.

तर महिंद्राची KUV100 NXT ही सर्वात स्वस्त एसयुवी आहे. कंपनी फेस्टिव सीजन मध्ये यावर धमाकेदार डिस्काउंट ऑफर करत आहे. ज्याची माहित अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. तर 5.67 लाख रुपयांची सुरुवाती किंमत असलेल्या या एसयुवीवर कंपनी पूर्णपणे 62 हजारांचा डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटवर 33055 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 20 हजारांची एक्सचेंज ऑफर आणि 4 हजारांचा कॉर्पोरेट ऑफरसह 5 हजार रुपयांचे अन्य ऑफर्स सुद्धा सामील आहेत.(Fire Safety Gadgets: कार मध्ये आग लागण्यापासून बचाव करतील 'हे' गॅजेट्स, किंमत 500 रुपयांपासून सुरु)

Mahindra Bolero ही भारतात सर्वाधिक पसंद केली जाणारी कार आहे. बोलोरो ही टॅक्सी ते खासगी वाहनासाठी वापर केला जातो. त्याचसोबत एसयुवी जबरदस्त ऑफ रोडिंग फिचर्स लेस आहे. दिवाळी सीजनमध्ये 8.01 लाख रुपये सुरुवाती किंमत असून त्यावर पूर्णपणे 20,2250 रुपये डिस्काउंट दिला जाणार आहे. या ऑफर मध्ये 6550 रुपयांचा कॅस डिस्काउंट, 10 हजारांचा एक्सचेंज ऑफर आणि 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट ऑफर मिळणार आहे.