1 लाखाच्या बजेटमध्ये मिळतील या '5' दमदार बाईक्स !

भारत मधे टू-व्हीलर्सचे सर्वात मोठे मार्केट आहे, असे बोलले जाते. कॉलेजमधील विद्यार्थ्यापासून ते जॉब करणाऱ्यांपर्यंत सर्वांना आपल्याकडे एक दमदार बाईक असावी, असे वाटते. गेल्या १० वर्षात भारतीय बाजारात अनेक जबरदस्त बाईक्स लॉन्च झाल्या. पण भारतीय ग्राहक ७० हजार ते १ लाखापर्यंतच्या बाईक खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. तर या रेंजमध्ये कोणकोणत्या बाईक उपलब्ध आहेत? पाहुया बाईकचे सर्वात चांगले पर्याय...

 

सुजुकी जिक्सर/एसएफ:

सुझुकीच्या या बाईकमध्ये 154.9 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14.8 हॉर्सपावर च्या ताकदीवर चालते आणि 14 न्यूटन मीटर टॉर्क जेनरेट करते. ही अत्यंत आरामदायी बाईक असून जिक्सरची किंमत 80,929 रुपये आहे. तर एसएफची किंमत 96,386 रुपये आहे.

एव्हेंजर 220ःGixxer

ही बाईक लॉन्च होऊन १० वर्षांहुन अधिक काळ लोटला. परंतु, या बाईकची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. मात्र बाईकमध्ये अनेक बदल करण्यात आले. बजाजच्या या बाईकमध्ये 220 सीसी, सिंगल-सिलिंडर इंजिन असेल जे 18.8 बीएचपीचे पावर आणि 17.5Nm चे टॉर्क देते. यात 5-स्पीड गियरबॉक्स लावण्यात आला आहे. या बाईकची किंमत 94,464 रुपये आहे.

Avenger-01[1]

बजाज पल्सर 200 एनएस:

या बाईकमध्ये 199.5 सीसीचा सिंगल सिलेंडर, लिक्वीड कुल्ड इंजिन आहे. याशिवाय बाईकमध्ये 17 इंचाचे एलॉय व्हिल लावण्यात आले आहेत. यासोबतच यात स्प्लिट सीट, स्लीक टेल सेक्शनसारखे फिचर्स आहेत. याची किंमत 98,714 रुपये आहे.

Pulsar-200[1]

होंडा सीबी हॉरनेट 160आरः

होंडाने सीबी हॉरनेट 160आरचे मॉडेल लॉन्च केले. यात 160R च्या स्टाईलच्या जुन्या व्हर्जनप्रमाणेच आहे. यात नवे कलर ऑप्शन आणि ग्राफिक स्टाईल्स दिले आहेत. या बाईक्स स्टायलिश आणि दमदार आहे. यात 162.7सीसी चे एअर कुलड इंजिन देण्यात आले आहे. या बाईकचे चार पर्याय उपलब्ध आहेत. याची किंमत 84,675 पासून सुरु होते.

Hornet

टीवीएस अपाचे आरटीआर 200 4वी:

या बाईकची क्षमता 197.75 सीसी आहे. त्याचबरोबर पॉवर आरपीएमवर 20.5 बीएचपी आहे. हे इंजिन 4 वॉल्वसहीत येते. सेगमेंटची अशी पहिली बाईक आहे ज्यात एडवांस्ड ‘A-RT स्लिपर कल्च’देण्यात आले आहे. यात इतर बाईकच्या तुलनेत क्लच ऑपरेट करण्यात अधिक मेहनत लागते. बाईकच्या बेस मॉडलची किंमत 95,185 रुपये आहे.

Apache-1[1]