Free Ola Scooter Offer: तुम्ही ओला स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. कारण ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) चे प्रमुख भाविश अग्रवाल 10 ग्राहकांना ओला स्कूटर मोफत (Free Ola Scooter)देणार आहेत. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घेऊयात. भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी एका ट्विटमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांची कंपनी 10 ग्राहकांना ओचर कलरची ओला स्कूटर मोफत देणार आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये 200 किमीची रेंज पूर्ण करेल. कंपनीला 2 रायडर्स मिळाले आहेत. MoveOS2 वरील एका रायडरने आणि 1.0.16 वरील दुसर्याने कमाल केली आहे. भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून हा पराक्रम कोणीही करू शकतो असे म्हटले आहे.
भाविश अग्रवाल पुढे म्हणाले की, विजेते घोषित केलेल्या ग्राहकांना जून महिन्यात कंपनीच्या ओला फ्युचर कारखान्यात बोलावले जाईल आणि तेथे त्यांना ओला स्कूटरची मोफत डिलिव्हरी केली जाईल. ओला स्कूटर्सची नवीन खरेदी विंडो 21 मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. ही विंडो शेवट 17 आणि 18 मार्च रोजी उघडली होती. यावेळी कंपनीने ओला स्कूटरच्या किमतीत 10 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. (हेही वाचा - Mumbai: आता अन्न कचऱ्यापासून निर्मित विजेवर चार्ज होणार Electric Vehicles: मुंबईमध्ये उभा राहिले भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन)
Looking at the excitement, we’ll give a free Gerua scooter to 10 more customers who cross 200km range in a single charge!
We have 2 who’ve crossed, one each on MoveOS 2 and 1.0.16. So anyone can achieve!
Will host the winners at the Futurefactory in June to take their delivery!
— Bhavish Aggarwal (@bhash) May 20, 2022
As promised, @karthikbr007, here’s your free Gerua for breaking records with 200kms range in a single charge!
Many ICE 2Ws don’t have this range on a full petrol tank😄
Move OS 2 makes the best scooter in the world even better!#EndICEage pic.twitter.com/lTFmKythJw
— Bhavish Aggarwal (@bhash) May 17, 2022
Ola S1 Pro विक्रमी 202Km रेंज -
कार्तिकने शेअर केलेल्या फोटोनुसार, त्याच्या Ola S1 Pro स्कूटरने एका चार्जमध्ये 202 किमीचा पल्ला गाठला आहे. ओला स्कूटरने नवीन इको रायडिंग मोडसह ही प्रभावी कामगिरी केली आहे. 202 किमी अंतरानंतरही बॅटरी 3 टक्के शिल्लक आहे. वापरकर्त्याने ट्विटरवर ओला इलेक्ट्रिक आणि त्याचे सीईओ भाविश अग्रवाल यांना टॅग केले आहे. या राईडरने भाविश अग्रवाल यांना टॅग केलं आहे. त्यानंतर भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या अधिकृत खात्यातून उत्तर दिले आहे.
नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच -
यापूर्वी सोशल मीडियावर ओला स्कूटरशी संबंधित अनेक तक्रारी आल्या होत्या. बहुतांश तक्रारी कंपनीच्या स्कूटर रेंज आणि रिव्हर्स फीचरशी संबंधित होत्या. अशा परिस्थितीत स्कूटरसाठी नुकतीच नवीन ऑपरेटिंग सिस्टम MoveOS2 लाँच करण्यात आली आहे. याआधी पुण्यात ओला स्कूटरला लागलेल्या आगीमुळे कंपनीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.