Electric Vehicle | (Representational Purpose | PC: Pixabay.com)

इलेक्ट्रिक चार्जिंग सोल्यूशन्स (EV Charging Solutions) प्रदाता टाटा पॉवर (Tata Power) कंपनीने एक महत्त्वाची माहिती दिलीआहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात पुणे, नोएडा, सुरत यांसह भारताली प्रमुख शहरांमध्ये सुमारे 25,500 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंक पॉइंट्स उभारण्यात येणार आहेत. कंपनी ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 (Auto Expo 2023 ) मध्ये हाय-टेक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सोल्यूशन्सची श्रेणी दाखवत आहे. या श्रेणीमध्ये Tata Power कंपनीचे व्यापक EV चार्जिंग नेटवर्क चालवणार्‍या तंत्रज्ञानाचा प्रथमदर्शनी अनुभव (EZ चार्ज) उपस्थितांसोबत सामायिक करण्या आला. ज्यामध्ये EV चार्जिंगसाठी सर्वाधिक डाउनलोड केलेल्या मोबाईल अॅप्सपैकी एक Tata Power EZ चार्जला मोठा प्रतिसाद लाभल्याचे कंपनीने म्हटले.

टाटा पॉवर कंपनीने म्हटले आहे की, हे अॅप प्रवाशांना जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यात, चार्जिंग पॉइंट्सची रिअल-टाइम उपलब्धता जाणून घेण्यास आणि चार्जिंग स्थितीबद्दल अपडेट्स प्राप्त करण्यास मदत करते. कंपनीने आपल्या नेटवर्क ऑपरेशन्स सेंटर (NOC) बद्दल माहिती प्रदर्शनात असल्याचे देखील सांगितले की, केंद्र भारतभर चार्जिंग स्टेशनच्या प्रभावी परिचालन व्यवस्थापनात मदत करते. (हेही वाचा, Pune: महिंद्रा पुण्यातील ईव्ही प्लांटसाठी 10,000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक)

ईव्ही चार्जिंग स्पेसमध्ये त्याच्या व्यापक उपस्थितीद्वारे, कंपनीने सांगितले की ती 3,600 सार्वजनिक किंवा अर्ध-सार्वजनिक चार्जर आणि 23,500 पेक्षा जास्त निवासी चार्जर प्रदान करते. टाटा मोटर्सने सांगितले की, यापैकी अनेक चार्जिंग स्टेशन जलद चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि मॉल्स, हॉटेल्स, विमानतळ आणि ऑफिस कॉम्प्लेक्स यासारख्या विविध मोक्याच्या ठिकाणी आहेत.