Electra Meccanica Solo Car | (Photo Credits: Electra Meccanica)

जागतीक ऑटो मार्केटमध्ये एका तीन चाकी कारची चांगलीच चर्चा रंगली आहे. या कारचे वैशिष्ट्य असं की यात केवळ एकच पॅसेंजर बसू शकतो. या ऑल इलेक्ट्रिक थ्री व्हील कार ( Three-Wheeler Solo Microcar) निर्माती आहे कॅनडास्थित कंपनी Electra Meccanica. या कंपनीने आपल्या ऑल इलेक्ट्रिक माइक्रो सिंगल पैसेंजर कार 'Solo' ला आंतरराष्ट्रीय बाजारात 2016 मध्येच उतरवले होते. या कारची किंमत आहे $15,500 USD म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 11 लाख रुपये.

इलेक्ट्रा मॅकेनिका (Electra Meccanica) या कंपनीने गेल्या वर्षी एका चिनी कंपनीसोबत करार केला. या करारानुसार 2020 पर्यंत या कारची 100 यूनिटची निर्मिती करण्यात येईल. कंपनीने केलेला दावा असा की, सिंगल पॅसेंजर कारला आतापर्यंत 20 हजारांहून अधिक ग्राहकांनी बुक केले आहे. पुढे या कंपनीने असेही म्हटले आहे की, जनरल मोटर्स सारख्या अनेक कंपन्या आपले उत्पन्न बंद करत आहेत तर, दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रा सारख्या कंपन्या सिंगल सीटर कारच्या रुपाने ऑटो सेक्टरला एक नवी ओळक देत आहेत.

दरम्यान, दिवसेंदिवस अधिक मर्यादित होत चाललेले इंधनाचे साठे, सातत्याने वाढत असलेले इंधन दर या समस्या जगभरातील सर्वच देशांसमोर आहेत. पण, त्याहूनही एक मोठी समस्या आहे ती म्हणजे प्रदुषण. औद्योगिक विकासामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रदुषण वाढते आहे. त्यात रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदुषणाचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. (हेही वाचा, टॉप 5 पेट्रोल फ्री कार, भारतात लवकरच लॉन्च; इंधन दरवाढीपासून ग्राहकांची सुटका, पाहा किंमत, कशी आहेत फिचर्स?)

वाढत्या प्रदुषणाला आळा कसा घालायचा हा जगासमोर प्रश्न निर्माण झाला असतानाच इलेक्ट्रिक कार आणि इतर वाहने पदार्पण करत आहेत. त्यामुळे या नव्या बदलाचे जगभरातून स्वागत होत आहे. मात्र, ही सर्व वाहने सध्यास्थितीत तरी बरीच महाग आहेत. त्यामुळे या नव्या बदलाने महागाईशी मेळ घातला तर, इलेक्ट्रीक वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल.