जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 9 डॉलरने कमी झाल्या आहेत. मंदीच्या अपेक्षेने इंधनाचा वापर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर ही घट दिसून आली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मुंबई पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर आहे, तर दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत, तर क्रूडच्या किमती एका वेळी प्रति बॅरल $140 वर गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $113.8 होती, जी आज सकाळी प्रति बॅरल $105.4 वर आली. WTI ची किंमत प्रति बॅरल सुमारे $101 आहे.
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांनीही व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा होता. पण महाराष्ट्रात मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. तत्कालीन ठाकरे सरकारवर त्यावेळी विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात बदल झाला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत बोलताना पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. (हे देखील वाचा: Indian Railway: खासदारांनी लुटला मोफत रेल्वे प्रवासाचा आनंद; 5 वर्षात केले 62 कोटींचे बिल; माहिती अधिकारात खुलासा)
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर
पुणे पेट्रोल 110.88 रुपये आणि डिझेल 95.37 रुपये प्रति लिटर
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर