Honda CBR1000RR-R फायरब्लैड आणि SP वेरियंटमधील बाईकची भारतात बुकिंग सुरु, जाणून घ्या फिचर्स
CBR1000RR-R Fireblade (Photo Credits-Twitter)

Honda मोटरसायकल अॅन्ड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सुपर स्पोर्ट्स कॅटेगरी मधील दोन नव्या वेरियंट्सच्या CBR1000RR-R Fireblade आणि  Fireblade SP ची बुकिंग सुरु केली आहे. या दोन्ही मोटरसायकल भारतात पूर्णपणे बिल्ट अप युनिट रुटच्या (CBU) माध्यमातून आणल्या जाणार आहेत. तसेच Honda CBR1000RR-R Fireblade आणि Fireblade-SP कंपनीने 2019 EICMA शो दरम्यान मिलान येथे झळकवल्या होत्या. होंडा कंपनीच्या सुपर स्पोर्ट्स लाइन अप मधील सर्वाधिक पावरफुल होंडा फायरब्लॅड आहेत.

Fireblade SP मध्ये दुसरे जनरेशन Ohlins स्मार्ट इलेक्ट्रॉनिक कंट्रोल (S-EC) सस्पेंशन आणि युजर इंटरफेस व्यतिरिक्त नवे ब्रेम्बो स्टाइलेमा बॅक कॅपिलर्स- 330mm डिस्कसह 2 लेव्हल ABS आणि एक क्विक शिफ्टर यांचा सहभाग आहे. 2020 Fireblade च्या बुकिंगवर होंडा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर- सेल्स अॅन्ड मार्केटिंग, यदविदर सिंह गुलेरिया यांनी असे म्हटले आहे की, बाईक राईड्सला या दोन मोटरसायकल जरुर पसंदीस पडतील. भारतात Honda Bigwing  डीलरशीप येथे याची बुकिंग सुरु करण्यात आली आहे. याची डिलिव्हरी ऑगस्ट 2020 अखेर पर्यंत करण्यात येणार आहे.(Royal Enfield Meteor 35 आणि Hero Xpulse 200T ऑगस्ट महिन्यात होणार लॉन्च)

2020 Honda CBR1000RR Fireblade मध्ये एक 1000cc चे इन-लाइन फोर सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 14,500rpm वर 214 bhp ची पॉवर आणि 12,500 rpm वर 113 Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. यामध्ये नवे बोर आणि स्ट्रोक (81mmX48.5mm) दिले असून जे समान मोटीजीपी RC213V मोटरसायकलमध्ये आहे.