Royal Enfield Meteor 35 आणि Hero Xpulse 200T ऑगस्ट महिन्यात होणार लॉन्च
Royal Enfield (Photo Credits-Twitter)

भारतात हळूहळू व्यापार आणि उद्योगधंदे सुरु होत चालले आहेत. त्यानुसार महिन्यानुसार टू-व्हिलर्सच्या खरेदीचे प्रमाण ही वाढले आहे. बहुतांश कंपन्या सध्या त्यांच्या नव्या मॉडेल्स लॉन्च करत आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये कंपन्या त्यांच्या काही टू-व्हिलर्स लॉन्च करणार आहेत. यामध्ये Royal Enfield Meteor 35 आणि Hero Xpluse 200T यांचा समावेश आहे. तर Royal Enfield Meteor 350 भारतीय बाजारात ऑगस्ट महिन्यात त्यांची Meteor 350 लॉन्च करणार आहे. खरंतर ही मोटरसायकल जुन महिन्यात लॉन्च करण्यात येणार होती. परंतु कोरोना व्हायरसमुळे त्याची लॉन्चिंग पुढे ढकलली. नवी मोटरसायकल Thunderbird 350 ला रिप्लेस करणार आहे.(Honda X-Blade BS6 खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींबाबत जरुर जाणून घ्या)

यामध्ये नवे 350 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले असून जे BS6 मानकांपेक्षा लेस असून ती एका वेगळ्या आर्किटेक्चवर बनवण्यात येणार आहे. कंपनी यामध्ये काही अपडेट्ससह नवे डिझाइन देणार आहे. Royal Enfield यांनी असे म्हटले आहे की, Meteor 350  कंपनीने अन्य काही  एक्सेसरीज सुद्धा दिले आहे. भारतीय बाजारात याची किंमत 1.7 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. (MG Hector Plus SUV भारतात लॉन्च, जाणून याची वैशिष्ट्ये आणि किंमतीविषयी)

Hero MotoCorp  यांनी त्यांची BS6 XPulse 200T आणि BS6 Xtreme 200S ही अधिकृत असलेल्या वेबसाईट्सवर झकळवली आहे.  या दोन्ही मोटरसायकल ऑगस्ट महिन्यात लॉन्च होणार आहेत. BS6 Hero Xpluse 200T चे स्पेसिफिकेशन बाबत अद्याप काही सांगण्यात आलेले नाही. परंतु याचे सेस्पिफिकेशन BS6 Hero XPulse 200 सारखेच आहे. HEro Xtreme 200s सारखे Xtreme 200R चे 199cc सिंगल सिलेंडर, दोन-वॉल्व इंजिन दिले जाणार असून जे 8,000 rpm वर 18bhp ची पॉवर आणि 6500 rpm वर 17.1Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. या दोन्ही बाईक्सच्या किंमतीत 5 हजार रुपयांची वाढ झालेली पहायला मिळू शकते.