Benelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक
Benelli-Imperiale-400 (Photo Credits-

भारतात कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे वाहन निर्माता कंपन्या सणाच्या सीजनमध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत. याच दरम्यान आता इटली मधील प्रिमियम बाइक निर्माता कंपनी बेनली  यांनी आपली सर्वाधिक लोकप्रिय बाइक Benelli Imperiale 400 साठी एक विशेष ऑफरची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत तुम्हाला प्रति महिना 4999 रुपये देऊन EMI वर ही बाइक आपल्या घरी आणण्याची संधी देत आहे.(Harley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध)

Benelli Imperiale 400 वर कंपनी 85 टक्के लोनची सुविधा देत आहे. त्याचसोबत ईएमआय सुद्धा 4999 रुपयांपर्यंत कमी केला आहे. म्हणजेच जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर डाउन पेमेंटसाठी 15 टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. त्यानंतर उर्वरित रक्कम कर्जाच्या स्वरुपात देऊ शकणार आहात. बेनली इम्पीरियल 400 मध्ये इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शनसह BS6 कम्प्लायंट SOHC, सिंगल-सिलेंडर युक्त फोर-स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन मिळणार आहे. जो 6000 आरपीएमवर 21bhp ची पॉवर आणि 3500 आरपीएमवर 29Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. भारतात बेनली इम्पीरियल 400 ची किंमत 1.99 लाख रुपयांपासून सुरु होणार आहे.

बेनली आपल्या या बाइकसह तीन वर्षांची असीमित किलोमीटर वॉरंटी आणि दोन वर्षाची सेवा देणार आहे. तिसऱ्या वर्षात मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट, पिक अॅन्ड ड्रॉप सुविधा आणि 24x7 RSA सेवांचा सहभाग आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही बाइक खरेदी करायची असल्यास 6000 रुपये देऊन कंपनीच्या वेबसाईटवरुन ही बाईक बेनली डिलरशीपच्या माध्यमातून बुकिंग करता येणार आहे.(Nexon XM(S) वेरियंट भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

बेनली इंडियाचे प्रबंध निर्देशक विकास झाबख यांनी असे म्हटले होते की, आम्ही ग्राहकांसाठी एक अशी स्किम सुरु केल्याने आम्हाला आनंद होत आहे. त्यानुसार इम्पीरियल 400 खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सणाच्या वेळी ज्यांना बाइक घ्यायची आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.