2021 BMW S1000R भारतात लॉन्च, दमदार इंजिनसह मिळणार हे मोठे डिझाइन अपडेट्स
2021 BMW S1000R (Photo Credits-Twitter)

BMW Motorrad India ने मंगळवारी आपली 2021 BMW S1000R नेकेड स्पोर्ट्स मोटरसायकल लॉन्च केली आहे. ही एक पॉवरफुल मोटरसायकल असून जी 17,90,000 रुपयांच्या किंमतीत उतरवली आहे. खासियत अशी की, भारतात या मोटरसायकलचे प्रोडक्शन करण्यात आलेले नाही. तक पूर्णपणे बिल्ट अप युनिटच्या रुपात लॉन्च केली आहे. आज पासून कंपनीने या मोटरसायकलच्या बुकिंगसाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे ही मोटरसायकल घेण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना भारतातील BMW Motorrad India च्या डिलरशिप्सवर जाऊन ती बुकिंग करता येणार आहे.

कंपनीची ही मोटरसायकल 3 ट्रिम्समध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये स्टँडर्ड, प्रो आणि प्रो एम स्पोर्ट्सचा समावेश आहे. स्टँडर्ड ट्रिमबद्दल बोलायचे झाल्यास ती 17.90लाख आणि हायर ट्रिम Pro आणि Pro M Sport ही 19.75 आणि 22.50 लाख रुपयांत लॉन्च केली आहे.(Tesla च्या सर्वाधिक स्वस्त कारची भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग सुरु, ड्रायव्हिंग रेंजसह किंमतीबद्दलचा वाचा रिपोर्ट) 

इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे झाल्यास या मोटरसायकलमध्ये Euro 5/BS6 कम्पायंट 999cc चा इनलाइक 4 सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. जो 11,000rpm वर 165bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 9250rpm वर 114Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. हे इंजिन सिक्स स्पीड गिअरबॉक्ससह जोडले आहे.(धमाकेदार फिचर्ससह लवकरच लॉन्च होणार Royal Enfield ची नवी मोटरसायकल, स्मार्टफोनला ही कनेक्ट करता येणार) 

दरम्यान, बीएमडब्लू एस1000आर आपल्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत त्यात काही मोठे बदल केले आहेत. यावर अधिक काम कंपनीकडून करण्यात आले आहे. अगदी नव्या स्टाइलिंगसह बाईकला एक अपडेटेड पॉवरट्रेन आणि उत्तम फिचर्स दिले आहेत. या मोटरसायकलमध्ये ग्राहकांना 6.5 इंचाचा टीएफटी मल्टीफंक्शनल इंस्ट्रुमेंट पॅनल मिळणार आहे. जो रायडरला रायडिंग दरम्यान महत्वाची माहिती उपलब्ध करुन देणार आहे. या मोटरसायकलमध्ये 4 रायडिंग मोड्स दिले आहेत. तसेच रायडिंग मोड्सला इंजिन (थ्रॉटल), इंजिन ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हिली कंट्रोल, एबीएस आणि एबीएस प्रो परफॉर्मेन्सनुसार कंट्रोल करण्यासाठी तयार केले आहेत.