 
                                                                 एका ड्रगमुळे (Medicine) अमेरिकेतील लोकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. देशात या औषधाने अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. या औषधाचे नाव Xylazine असे असून, म्हटले जात आहे की हे औषध मानवांना झोम्बी बनवत आहे. म्हणजेच या औषधाच्या सेवनानंतर होणाऱ्या दुष्परिणामांवर वेळीच उपचार केले नाहीत, तर प्रभावित व्यक्ती झोम्बीसारखी दिसते.
या औषधाचे सेवन केल्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे लोकांची त्वचा हळूहळू सडू लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे औषध बहुतेक लोकांच्या त्वचेवर परिणाम करत आहे. तज्ज्ञांच्या मते, प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो, मात्र आता हेरॉईनसारख्या ड्रग्जवर उतारा म्हणूनही Xylazineचा वापर केला जात आहे.
Xylazine बद्दल बोलायचे तर, यूएस फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनने प्राण्यांवर या औषधाचा वापर करण्यास मान्यता दिली होती. याचा प्रभाव ऍनेस्थेसियासारखाच आहे. या औषधाचे सेवन केल्यावर श्वास मंदावतो व व्यक्ती झोपेच्या गर्तेत जातो. म्हणूनच अनेक लोक या औषधाचा वापर नशेसाठी करत असल्याचे बोलले जात आहे. याचा दुष्परिणाम म्हणून शरीरावर जखमा दिसू लागतात. पुढे अशीही वेळ येते की व्यक्तीची त्वचा हळू हळू सडू लागते. त्यानंतर तो अवयव कापून काढण्याशिवाय पर्याय उरत नाही. (हेही वाचा: Tattoo Record: वृद्ध जोडप्याने केला टॅटू काढून घेण्याचा विक्रम; तब्बल 2,000 तास घालवले खुर्चीवर)
हे औषध पहिल्यांदा फिलाडेल्फियामध्ये सापडल्याचे बोलले जात आहे. यानंतर, सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिस मार्गे ते देशभरात अनेक ठिकाणी पोहोचले आणि त्याचा वापर वाढू लागला. असा दावा केला जात आहे की हे औषध घेतल्यानंतर लोक झोम्बीसारखे वागू लागतात. आता हे औषध अमेरिकेत Tranq Dope आणि Zombie Drugs या नावांनी ओळखले जाऊ लागले आहे. या औषधाचे सेवन वाढल्याने नव्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे प्रशासन व अधिकारी यांच्यावरील ताण वाढला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
