You can buy a house in Sambuca, Italy: स्वत:चं घर हे आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न. अनेक लोक आपल्या आयुष्याची सर्व पुंजी जमा करतात आणि ती घरासाठी गुंतवतात. बदल्यात काय मिळते तर, तीन किंवा चार खोल्यांचे घर. काही लोकांना तर, दोन किंवा एका खोलीच्या घरावरच समाधान मानाव लागतं. याला लोकांचे वार्षीक उत्पन्न जसे कारणीभूत आहे तशीच वाढती महागाईसुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही परीसरात चौकशी केली तर घरांच्या किमती या काही लाखांपासून सुरु होतात. पुढे त्या काही कोटींवर स्थिरावत असल्याचे पाहायला मिळते. अशा स्थितीत जर तुम्हाला कोणी म्हणाले इथे केवळ 80 रुपयांत घर मिळते तर, तुम्हाला आश्चर्य नाही वाटणार. खरे तर आश्चर्य वाटण्यापेक्षा तुम्ही कदाचित विश्वासच नाही ठेवणार. पण, तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल कारण खरोखरच इथे तुम्ही केवळ 80 रुपयांमध्ये घर खरेदी करु शकता. होय, हे खरे आहे. काय म्हणालात कुठे? घ्या जाणून..
होय, हे शक्य आहे-
होय, हे शक्य आहे. 80 रुपयांमध्ये घर हे स्वप्न नव्हे तर, वास्तव आहे. इटली देशातील सामबुका (Sambuca) येथे हे शक्य आहे. तुम्हाला जर सामबुका येथे घर खरेदी करायचे असेल तर, तुम्हाला खर्च करावे लागेल 1 युरो. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये फक्त 80 रुपये. लाल रंगांच्या द्राक्षांची शेती होत असलेलेल हे शहर आपले सौंदर्य आणि विविध वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. शांत वातावरण आणि फळं, फुलांनी सजलेली इथली सुंदर घरं शहराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. आता तर तुम्ही इथे घर खरेदी करण्यासाठी विचार करता आहात ना.
तीन महत्त्वाच्या अटी-
जर तुम्ही 80 रुपये देऊन इथे घर खरेदी करु इच्छित असाल तर, त्यासाठी तुम्हाला काही अटींची पुर्तता करावी लागेल. अट क्रमांक एक- घर खरेदी केल्यावर तुम्हाला त्या घराची तीन वर्षांच्या आत दुरुस्ती (Renovate) करावी लागेल. त्यासाठी अंदाजे खर्च 17,000 डॉलर इतका म्हणजे भारतीय चलनात 12 लाख रुपये इतका खर्च येईल. अट क्रमांक दोन- घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला अनामत रक्कम (Security Deposit) ठेवावी लागेल. ही सिक्योरिटी डिपॉझीट (Security Deposit) रक्कम तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडे ठेवावी लागेल. ही रक्कम आहे तब्बल 5 हजार युरो. म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे 4 लाख 4 हजार रुपये. (हेही वाचा, अजब देश! लग्न केल्यावर २५ लाखांचे बिनव्याजी कर्ज, ३ अपत्ये झाल्यास कर्ज माफ, 4 अपत्यांवर आयुष्यभर राहा Tax Free)
घर स्वस्त असण्याची कारणं-
इथेर घरं स्वस्त असण्याची कारण असं की, सामबुका येथे राहणारे लोडगा इथून हळूहळू स्थलांतरीत होऊ लागले आहेत. ते ही जागा सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत. त्यामुळे या शहराची लोकसंख्या वारंवार घटते आहे. इथे दळणवळणाच्या सुवीधेचा प्रचंड अभाव आहे. या कारणामुळेच इथले लोक शहर सोडून इतर ठिकाणी जात आहेत. त्यामुळे तुम्ही दळणवळण सोईसुविधांचा अभाव असलेल्या ठिकाणी घर घेऊ इच्छित असाल, तर तुमचे या शहरा स्वागतच आहे. कशी वाटली आयडियाची कल्पना?