जापान पीएम योशिहिदे सुगा (Photo Credits: Twitter)

जपान मध्ये सत्तेत असलेल्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे नेता योशिहिदे सुगा (Yoshihide Suga )यांना आज (16 सप्टेंबर) नवे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे. सुगा हे जपानचे 99 वे पंतप्रधान आहेत. आज संसदेचं सत्र बोलावत त्यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान मागील पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता जपानच्या सत्तेची सूत्र योशिहिदे सुगा यांच्या हाती आली आहे.

सुगा यांनी 7 वर्षांपेक्षा अधिक काळ आबे यांच्या मुख्य कॅबिनेटमध्ये सचिव पदावर काम केले आहे. सुगा आता इंपीरियल पैलेस मध्ये औपचारिक उद्घाटनापूर्वी त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करतील. दरम्यान सिन्हुआ या वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, 71 वर्षीय योशिहिदे सुगा हे 1991 मध्ये किची मियाजावा यांच्यानंतर हे पद सांभाळणारे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान आहे. त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर 2021 म्हणजेच आबे यांच्या कार्यकाळापर्यंत राहणार आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्या निवडीनंतर ट्वीटर च्या माध्यमातून अभिनंदन करत नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

कोविड जागतिक आरोग्य संकटाचा फटका जपानच्या देखील अर्थव्यवस्थेला

बसला आहे. जपानची अर्थव्यवस्था पुन्हा पुर्नजीवित करण्याचा प्रयत्न जपान सरकार करणार आहे. दरम्यान त्यांनी 230 ट्रिलियन येन (2.2 ट्रिलियन अमेरिकी डॉलर) पॅकेज जाहीर केले आहे.