Japan Local Body Elections 2019: महाराष्ट्रासह भारत देशामध्ये सध्या लोकसभा निवडणूक 2019 चे वारे वाहत आहेत. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जपानमध्ये योगेंद्र सध्या निवडणूकीदरम्यान मतांचा जोगवा मागत आहेत. योगेंद्र पुराणिक (Yogendra Puranik) हे मूळचे पुण्याचे मात्र सध्या ते जपानच्या महापालिका निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. जपानमध्ये निवडणूक लढवणारे योगेंद्र पुराणिक हे पहिलेच भारतीय आहेत.
येत्या 21 एप्रिलला जपानमध्ये महापालिका निवडणूकांसाठी मतदान होणार आहे. या मतदानादरम्यान कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान (Constitutional Democratic Party of Japan) या पक्षाकडून योगेंद्र आपलं नशीब आजमावणार आहेत. जपानच्या एदोगावा महापालिकेसाठी हे मतदान पार पडेल तर 22 एप्रिल रोजी त्याचा निकाल हाती येणार आहे.
योगेंद्र पुराणिक यांच्या प्रचाराची झलक
योगेंद्र मूळचे पुण्याचे असून 1997 साली ते शिक्षणासाठी जपानला गेले पुढे बॅंकींग क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी केल्यानंतर आता ते जपानच्या राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत.