रिपोर्ट: चीन- पाकिस्तान भ्रटाचार करण्यात अव्वल, जगातील भ्रष्ट देशांची नावे जाहीर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

जगभरातील भ्रष्ट देशांची नावे समोर आली आहेत. त्यात भारतात भ्रटाचाराच्या बाबात सुधारणा झाली असल्याचे एका रिपोर्ट्सद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. तर 180 देशांच्या या सूचीत भारत (India) तीन स्थानाच्या सुधारणेने 78 व्या स्थानकावर पोहचला आहे. म्हणजेच भारतापेक्षा रुस (Russia), चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) सह 102 देशांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच सोमालिया सर्वांत मोठा भ्रष्ट देश म्हणून सांगितले आहे.

एका भ्रष्टाचार- निरोधक संगठन ट्रांसपरेंसी इंटरनॅशनलने वैश्विक भ्रष्टाचाराचा 2018 मधील आकडेवारीनुसार अहवाल सादर करण्यात आला आहे. या सूचीत एकूण 180 देशांची नावे आहेत. पहिल्या क्रमांकावक डेनमार्क येथे कमी भ्रष्टाचार होतो. तर भारत 78 व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी सादर केलेल्या रिपोर्ट्समध्ये भारत हा 2017 रोजी 81 व्या क्रमांकावर होता. त्यामुळे एका वर्षात आतमध्ये भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण घटले आहे.

भारतात भ्रटाचाराच्या बाबत सुधारणा झाली आहे. परंतु बाजूचे देश चीन आणि पाकिस्तान यांची स्थिती अंत्यंत खराब आहे. या सूचीत चीन 87 व्या स्थानकावर तर पाकिस्तान 117 व्या स्थानकावर आहे.

भ्रटाचारातील मुख्य देश सोमालिया (Somalia) ठरला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप यांच्या सरकारमुळे अमेरिकेची स्थिती खराब झाली आहे. या वर्षी अमेरिकेला 71 पॉईंट मिळाले असून टॉप 20 देशांच्या सूचीतून बाहेर झाला आहे. या वर्षीच्या क्रमवारीत अमेरिका 22 व्या स्थानकावर असून पूर्वी 18 व्या स्थानकावर होता.