World War 3: कोण होते जनरल कासिम सुलेमानी? ज्यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरुन अमेरिकी लष्कराने केले ठार
General Qassem Soleimani | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

ईरानचे (Iran) रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) प्रमुख आणि त्या प्रदेशाचे सुरक्षा व्यवस्थेचे मुख्य आर्किटेक्ट जनरल कासिम सुलेमानी (General Qassem Soleimani) यांचा बगदाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मृत्यू झाला. अमेरेकी लष्कराने (US Military) केलेल्या हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी हे मारले गेले. अलजज़ीरा या वृत्तवाहीनीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या पेंटागन येथील संरक्षण कार्यालयानेही कासिम सुलेमानी यांना मारल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. या वृत्ताची पुष्टी करताना पेंटागन येथील कार्यालयाने म्हटले आहे की, हा हल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने करण्यात आला होता. इरानकडून भविष्यात अमेरिकेवर केल्या जाणाऱ्या हल्ल्याला रोखण्यासाठीच हा हल्ला केल्याची पुस्तीही या कार्यालयाने जोडली आहे. जाणून घेऊया कोण होते जनरल कासिम सुलेमानी? का केला अमेरिकेने हल्ला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी कासिम सुलेमानी यांना ठार करण्याचे आदेश का दिले

जनरल कासिम सुलेमानी यांना ठार मारल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशावरुनच अमेरिकी लष्कराने कासिम सुलेमानी यांना मारण्यात आले. विदेशात असलेल्या अमेरिकी लष्करातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केवळ संरक्षणाच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.

ट्विट

अमेरिका ही प्रदीर्घ काळापासून ईरानवर आरोप करत आली आहे की, आपल्या आजूबाजूच्या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम अशीयात शिया मिलिशिया समूहाचे समर्थन करते. ईरानकडून विदेशात राबविण्यात येणारी गुप्त आणि विशेष अभियानं तसेच, प्रॉक्सी युद्ध यांसाठी जनरल कासिम सुलेमानी आणि कुद्स फोर्स जबाबदार आहे, असाही अमेरिकेचा दावा होता. दुसऱ्या बाजूला अनेक लोक हे कासिम सुलेमानी हे ईराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत असेही मानत. (हेही वाचा, World War 3: इराण कडून US ला कासिम सुलेमान हत्या प्रकरणी बदला घेण्याची धमकी)

एएनआय ट्विट

जनरल कासिम सुलेमानी यांच्याबद्दल सांगायचे तर ते इराकमध्ये इतके सर्वोच्च होते की, ते केवळ ईराकचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनाच रिपोर्ट करत असत. असेही सांगतात की, ईरानचे राष्ट्रपती हसन रुहानी यांच्या तुलनेत कासिम सुलेमानी हे अधिक शक्तीशाली होते. अमेरिका आणि इरान यांच्यातील बिघडलेल्या संबंधांबाबत अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केला आहे की, अमेरिकेकडून ईरानवर केलेल्या कारवाईतील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

सुलेमानी यांच्या हत्येचा संदर्भ देण्याचा प्रयत्न करत विद्वन स्टीफन वॉल्ड यांनी ट्विट केले आहे की, 'विचार करा की आम्ही कशी प्रतिक्रिया देत आहोत जर काही सल्लागारांनी संयुक्त चीफ्स अंडरटेकरेटरी ऑफ स्टेट किंवा डीएनआय (नॅशनल इंटेलिजन्स निदेशक) असलेल्या एका सदस्याची हत्या केली आहे'.