China: मसालेदार पदार्थ खाल्ल्याने महिलेच्या बरगड्या फ्रॅक्चर! जाणून घ्या आश्चर्यकारक अनोखी केस
Food (Photo Credits: Instagram/theroyalmaharajaig)

China: सर्व साधारण लोकांना जेवण आवडते, जर तुम्ही देखील मसालेदार पदार्थ खाण्याच्या शौकीनपैकी एक असाल तर तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे कारण मसालेदार जेवणामुळे एका महिलेच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. हा विनोद नाही सत्य घटना आहे. बरगड्या फ्रॅक्चर होवुन जबरदस्तीने उठून बसलेली एक महिला सध्या चर्चेत आहे, तिच्या छातीचा एक्स-रे समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या बरगड्या तुटलेल्या दिसत आहेत. मसालेदार जेवणामुळे पोटाच्या त्रासाऐवजी महिलेच्या बरगड्या कशा तुटल्या याचा विचार तुम्ही करत असाल. वास्तविक, मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर महिलेला इतका खोकला येऊ लागला की खोकताना तिच्या बरगड्या तुटल्या हे तर खुप धक्कदायक आहे.

बोलताना होत होता त्रास

हे अनोखे प्रकरण चीनमधील शांघाय येथील आहे. शांघायची रहिवासी असलेल्या हुआंगने काही मसालेदार खाल्ल्यानंतर खोकला आला तेव्हा तिने याबद्दल फारसा विचार केला नाही. मात्र, नंतर तिला बोलण्यात आणि श्वास घेताना दुखु लागल्याने तिने डाॅक्टर कडे जावुन तपासणी करुन घेण्याचा निर्णय घेतला. महिलेचे डॉक्टरांनी सीटी स्कॅन केले असता हुआंगच्या बरगड्या तुटल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्याच्या छातीवर मलमपट्टी केली आणि तिच्या बरगड्या बऱ्या होण्यासाठी पूर्ण महिनाभर अंथरुणावर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. (हे देखील वाचा: Two Boys Executed in North Korea: अमेरिका, कोरियन शो पाहणं 2 किशोरवयीन मुलांना पडलं महागात; सार्‍यांदेखत दिली मृत्यूदंडाची शिक्षा)

डाॅक्टरांनी दिला सल्ला

डॉक्टरांनी महिलेला सांगितले की हुआंगच्या बरगड्या तुमच्या त्वचेखाली स्पष्टपणे दिसू शकतात. बरगड्याच्या पिंजऱ्याला आधार देण्यासाठी कोणतेही स्नायू नसतात, म्हणून जेव्हा तुम्ही खोकता तेव्हा तुमच्या बरगड्या फ्रॅक्चर होणे सोपे होते. भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांनी हुआंगला बरे झाल्यानंतर त्याचे स्नायू आणि शरीराच्या वरचे वजन वाढवण्यासाठी अधिक शारीरिक व्यायाम करण्यास सांगितले.