Wife Allows Husband Other Woman: नवऱ्यासाठी कायपण! बायकोने दिली मुभा;  जाणून घ्या काय आहे प्रकरण
Husband Wife Relationship (Image Credit - Pixbay)

पती-पत्नीच्या नात्यापेक्षा मजबूत (Husband Wife Relationship) काहीही नाही. जेव्हा तुम्ही वैवाहिक नातेसंबंधात असता तेव्हा तुम्ही दोघांनी एकमेकांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. विवाह (Marriage) किंवा त्या बाबतीतील कोणत्याही नातेसंबंधात एक प्रामाणिकपणा आणि निष्ठा देखील असते. पण, जर तुम्हाला कळले की पत्नीने तिच्या पतीला इतर स्त्रियांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवण्याची परवानगी दिली आहे तर, तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? अमेरिकेतील 37 वर्षीय महिला मोनिका हुल्डने आपल्या पतीच्या गरजा पुर्ण करण्यात तिला आनंद मिळतो असा दावा केला आहे. मग त्या गरजा कोणत्याही असो. (Wife Chases Husband’s GF in Innerwear: बायकोने केला नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा पाठलाग; अंतर्वस्त्रातील महिलेने ठोकली धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं OMG!)

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मोनिकाचा दावा आहे की तिचे एकमेव ध्येय म्हणजे तिचा नवरा जॉनला आनंदी करणे हे आहे. मोनिकाचा असा विश्वास आहे की जॉनसोबतचे तिचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी, ती त्याला इतर महिलांसोबत फ्लर्ट करण्याची परवानगी देते, तसेच इतर महिलांसोबत त्याला शेअर करण्यात अजिबात संकोच करत नाही.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मोनिकाने लग्नाबद्दलच्या तिच्या विचित्र जिवनपद्धतीची माहिती दिली आहे. एक समर्पित पत्नी असल्याने, तिचे एकमेव काम आहे सामान्य गृहिणीचे, तिच्या पतीची काळजी घेणे आहे असे ती मानते. ती तिचा दिवस जॉनसाठी स्वयंपाक करण्यात आणि जॉनला इतर महिलांकडे पाठवल्यानंतर घराची साफसफाई करण्यात घालवते. ती घरातील सर्व कामे करण्यात व्यस्त असल्यामुळे पतीला वेळ देऊ शकत नसल्याचे कारण ती यासाठी देते.

इतर महिलांसोबत वेळ घालवल्यानंतर आणि जॉनला आवडेल तसे केल्यानंतर तो घरी परततो. जर तिचा नवरा आनंदी असेल तर ती देखील आनंदी असल्याचे मोनिकाने म्हटले आहे. जॉन जे सांगतो मोनिका सर्व तसेच करते असे देखील तीने सांगितले आहे. तो त्या पद्धतीचे कपडे वापरण्यास सांगते त्याच पद्धतीचे कपडे ती वापरत असल्याचे तिन म्हटले आहे.

मोनिकाने यावेळी सांगितले की जॉनला वाटते की मी घरी चांगले, आकर्षक कपडे घालून रहावे. काही स्त्रियांना काय घालावे काय घालू नये हे कदाचित कोणाला आवडणार नाही, परंतु मला जॉनचे असे सांगणे आणि सुचना देणे मला आवडते. यूट्यूबवर लव्ह डोन्ट जजला दिलेल्या मुलाखतीत, मोनिकाने आपल्या वैवाहिक जीवनाबद्दलची ही अनोखी माहिती दिली आहे.