COVID-19 Vaccine: कोरोना व्हायरस वरील 3 लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात; सुरक्षित आणि परिणामकारक लस वर्षाअखरेपर्यंत उपलब्ध- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
US President Donald Trump (Photo Credits: ANI)

आमच्याकडे 3 वेगवेगळ्या लसी क्लिनिकल ट्रायलच्या (Clinical Trials) अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही त्याचे उत्पादन आधीच करत आहोत त्यामुळे डोसेस अधिक प्रमाणात उपलब्ध होतील. तसंच त्यामुळे आम्हांला सुरक्षित आणि परिणामकारक लस या वर्षात मिळेल. एकत्रितपणे आपण कोरोना व्हायरसचा नायनाट करु, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात (Republican National Convention) सांगितले.

दरम्यान रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिक पार्टीचे राष्ट्रपतीपदाचे नामांकन स्वीकारले. या व्हर्चुयल अधिवेशनात व्हाईट हाऊसमधून बोलताना ट्रम्प म्हणाले की, "माझ्या समस्त अमेरिकन बांधवांना मी सांगू इच्छितो की, मी कृतज्ञतेने राष्ट्रपती पदाचे नामांकन स्वीकारत आहे."

ANI Tweet:

पुढे ट्रम्प म्हणाले की, "आम्ही कायदा पाळणाऱ्या अमेरिकन नागरिकांची रक्षा करत आहोत की नागरिकांना भीती दाखवणाऱ्या गुन्हेगारांना आणि हिंसक घटना घडवून आणणाऱ्यांना मोकळीक देत आहोत, हे तुमचे मत ठरवेल."

सोमवारी, रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात रिपब्लिक पार्टीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदासाठी नामांकित केले होते. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणूकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. या निवडणूकीत ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रेटिक पक्षाचे जो बिडेन यांचे मोठे आव्हान असेल.