Violent Clash In Mexico: मेक्सिकोमध्ये गुंड आणि गावकरी यांच्यात हिंसक संघर्ष; 11 जणांचा मृत्यू
Violent Clash In Mexico (PC - X/@LoveWorld_Peopl)

Violent Clash In Mexico: मध्य मेक्सिकोमधील (Central Mexico) गुन्हेगारी टोळीतील बंदूकधारी (Gangsters) आणि लहान शेतकरी समुदायातील रहिवासी यांच्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीत अकरा लोक ठार झाले. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मेक्सिको (Mexico) राज्याच्या पोलिसांनी सांगितले की, मेक्सिको सिटीपासून दूर असलेल्या टेक्सकल्टिटलान गावात ही हाणामारी झाली.

मृतांपैकी आठ गुन्हेगार टोळीचे सदस्य होते, तर तीन गावातील रहिवासी होते. पोलिसांनी या टोळीची ओळख पटवली नाही, परंतु हिंसक फॅमिलिया मिचोआकाना ड्रग कार्टेल एक दशकापासून त्या भागात वर्चस्व गाजवत आहे. (हेही वाचा -Kenya Fire Video: केनियाच्या नैरोबीमध्ये फर्निचरच्या दुकानात भीषण आग, नागरिकांमध्ये घबराट)

स्थानिक माध्यमांनी सांगितले की, फॅमिलिया मिचोआकाना बंदुकधारी पूर्वी गावात दिसून आले होते. त्यांनी स्थानिक शेतकर्‍यांनी प्रति एकर (हेक्टर) खंडणी फी देण्याची मागणी केली होती. यावर अधिकाऱ्यांनी कोणतही भाष्य केल नाही. (हेही वाचा - Iraq Fire: कुर्दिस्तान प्रांतात विद्यापीठाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू, आग विझवण्याचे काम सुरु)

व्हिडिओ पहा - 

मेक्सिकोमधील ड्रग कार्टेल्स जवळजवळ कोणत्याही कायदेशीर किंवा बेकायदेशीर व्यवसायातून पैसे उकळण्यासाठी ओळखले जातात. अनेकदा ते पैसे देण्यास नकार देणार्‍या रँचेस, फार्म किंवा स्टोअरवर हल्ला करतात किंवा जाळपोळ करतात.