Shooting | representative pic- (photo credit -pixabay)

यूएस (United States) मधील एका महिलेने चक्क उबेर चालकाला (Uber Driver) गोळी घातली आहे. महिलेने उबेर (Uber) कार बुक केली होती. उबेर कारमधून प्रवास करत असताना चालक (Uber Driver) अचानक रस्ता चुकला. त्यामुळे सदर रस्ता महिलेला अनोळखी वाटू लागला. त्यामुळे महिलेला आपले अपहरण होत असल्याचा संशय आला. त्या गैरसमजातून तिने चक्क उबेर चालकावरच गोळी (US Woman Shoots Uber Driver) झाडली. ज्यामध्ये उबेर चालक गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना टेक्सासमध्ये शुक्रवारी, 16 जून रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार,  फोबी कोपस (Phoebe Copas) असे महिलेचे नाव असून, ती 48 वर्षांची आहे. जीच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. तर , डॅनियल पिएड्रा गार्सिया (Daniel Piedra Garcia) असे उबर चालकाचे नाव आहे. चालक हा तिला मेक्सिकोला पळवून नेत असल्याचा संशय आला आणि तिने त्याच्यावर गोळी झाडली. (हेही वाचा, South Africa Firing: डर्बन येथील वसतिगृहात बंदुकधारींनी केलेल्या गोळीबारात 7 जण ठार, तर 2 जण जखमी)

दरम्यान, उबर चालकावर गोळी झाडल्यानंतर आरोपी महिलेने घटनास्थळावरुन पळ काढला. सध्या ती फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिची माहिती देणाऱ्यास सरकारने 1.5 दशलक्ष बॉंडचे इनाम आहे. चालकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना आणि प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, त्याची प्रकृती गंभीर आहे. आता त्याचा लाईफ सपोर्टही काढून घेण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी महिला मुळची केंटकी येथील आहे. प्रवास करुन ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी टेक्सासमध्ये निघाली होती. तिने एका उबेरला तिच्या प्रियकराला कामावरून सुटल्यानंतर स्थानिक कॅसिनोमध्ये भेटायला घेऊन जाण्यासाठी फोन केला. तथापि, 48 वर्षीय तरुणी जेव्हा "जुआरेझ, मेक्सिको" साठी महामार्ग चिन्हे पाहिली तेव्हा घाबरली आणि तिने थेट गोळीबारच केला.

स्थानिक मीडिया आउटलेटशी बोलताना उबरने म्हटले की, प्रवाशाच्या कृतीमुळे कंपनी घाबरली आहे. उबेर प्लॅटफॉर्मवर हिंसाचार सहन केला जात नाही. आम्हाला काय घडले याची जाणीव होताच आम्ही सदर प्रवाशावर बंदी घातली. कंपनीच्या प्रवक्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.