US Presidential Election 2020 Result: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पत्रकार परिषदेची घोषणा, 10.30 वाजता काय बोलणार याकडे लक्ष, अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक निकालाबाबत संभ्रम वाढला
Donald Trump | (Photo Credits: Facebook)

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या यूनाइटेड टेस्ट (US) म्हणजेच महासत्ता अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक निकाल 2020 (US Presidential Election 2020 Result ) बाबत जगभरात उत्सुकता आहे. राष्ट्राध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेले डेमोक्रेट्स (Democratic Party) पक्षाचे उमेदवार जो बिडेन (Joe Biden) आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन (Republican Party) पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात काट्याची टक्कर सुरु आहे. बिडेन हे 264 तर ट्रम्प 214 मतांवर अटकले आहेत. अद्यापही मतमोजणी सुरु आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळी 10.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेमुळे संभ्रम अधिकच वाढला असून या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, '' आज सकाळी 10.30 वाजता (यूएसच्या वेळेनुसार) आपण फिलाडेल्फीया येथे सर्वात मोठी पत्रकार परिषद घेणार आहोत.'' अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या मतांची अद्यापही मोजणी सुरु आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी विजयावर दावा सांगितला आहे. त्यातच ट्रम्प यांनी घोषणा केल्यामुळे संभ्रम अधिक वाढला आहे. (हेही वाचा, US Election 2020 Results Update: जो बायडेन यांनी चुकीच्या पद्धतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये, Donald Trump यांनी दिला इशारा)

ट्रम्प यांच्या ट्विट मालिकेबाबत बोलताना न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर रुडी जिउलियानी (former New York Mayor Rudy Giuliani) यांनी ट्रम्प यांच्या बाजूने कायदेतज्ज्ञांची एक टीम जाहीर केली. या पत्रकार परिषदेत आपण प्रसारमाध्यांना फिलाडेल्फीया येथे माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Rudy Giuliani यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, फिलाडेल्फीया सीझन 4 येथे वकिलांची मोठी पत्रकार परिषद सकाळी 11.00 (स्थानिक वेळेनुसार) आयोजित करण्यात आली आहे. परंतू, अवघ्या 8 मनिटांतच Rudy Giuliani यांनी आपल्या हँडलवरुन हे ट्विट हटविले.