Prime Minister Narendra Modi with US President Donald Trump | (Photo Credits: IANS | File)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प (Donald Trump) फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारत दौर्‍यावर येणार आहेत. दरम्यान या भारत दौर्‍यासाठी ते खूप उत्सुक असून सुमारे 5-7 लाख लोकं अहमदाबाद ते मोटेरा स्टेडियम दरम्यान भेटतील असं दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी दिवशी ते नवी दिल्ली आणि गुजरात मधील अहमदाबाद शहराला भेट देणार आहेत. दरम्यान काल व्हाईट हाऊसला भेट दिल्यानंतर मीडियाशी बोलताना एका प्रश्नाचं उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदीचं कौतुक करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) माझे खूप चांगले मित्र आहेत आणि ते उत्तम माणूस आहेत असे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी ला भारत दौऱ्यावर; White House ची माहिती.  

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा भारत दौर्‍यात अहमदाबादच्या न्यू स्टेडियम (मोटेरा स्टेडियम) ते एअरपोर्ट या दरम्यान लाखो लोक स्वागताला असतील असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यामध्ये दोन्ही देशात व्यापार, संरक्षण याबाबतच्या व्यापाराला चालना दिली जाईल. अमेरिकेमध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाच्या धर्तीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठीदेखील खास कार्यक्रम असेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील अहमदाबाद आणि दिल्ली येथील अधिकृत कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहे.

ANI Tweet 

सप्टेंबर 2019 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या कुटुंबासमवेत भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. तसेच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा वॉशिंग्टन दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांना भारत दौऱ्यासाठी पुन्हा आमंत्रण दिले होते. लवकरच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. तसेच ट्रम्प आणि मोदी यांच्यातही चर्चा होईल.