US President Trump Celebrates Diwali: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधीबरोबर ‘व्हाईट हाऊस’मध्ये साजरी केली दिवाळी
US President Trump celebrates Diwali at White House (PC- Twitter)

US President Trump celebrates Diwali: आज संपूर्ण देशात दिवाळोचा सण उत्साहात साजरा होत आहे. विशेष म्हणजे भारताबरोबरच इतर काही देशांतदेखील दिवाळीचा सण साजरा केला जातो. तसेच भारताबाहेर राहणारे भारतीय वंशाचे लोकंही दिवाळीचा सण दणक्यात साजरा करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांसोबत व्हाईट हाऊसमध्ये (White House) दिवाळी साजरी केली. यावेळी कमला हॉरिस, प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती, रोहित खन्ना, अॅमी बेरा आदी भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट - 

यावेळी भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. तसचं ट्रम्प यांनी दीप प्रज्वलन करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाउसमधील ही तिसरी दिवाळी आहे. व्हाईट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांनी 2009 साली सुरु केली होती.

हेही वाचा - Diwali Padva 2019 wishes: दिवाळी पाडव्याच्या आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी वापरा ही खास मराठी संदेश,शुभेच्छापत्र

ट्रम्प यांनी 2017 साली व्हाइट हाउसमध्ये आपली पहिली दिवाळी साजरी केली होती. त्यावेळी भारतीय-अमेरिकन समुदायातील निवडक काही नेते आणि ट्रंप प्रशासनाचे काही सदस्य उपस्थित होते. गेल्या वर्षी ट्रंप यांनी अमेरिकेतील तत्कालीन भारतीय राजदूत नवतेजसिंह सरना यांना दिवाळी साजरी करण्यासाठी रुझवेल्ट रूममध्ये आमंत्रित केले होते.