आली लहर केला कहर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 'Happy Good Friday' म्हणत दिल्या दुःखद दिवसाच्या शुभेच्छा; जगभरातून होत आहे टीका
Trump wishes 'Happy Good Friday'

सध्या ख्रिश्चन धर्मियांचा (Christians) पवित्र आठवडा (Holy Week) चालू आहे, त्यातील आज ‘गुड फ्रायडे’चा (Good Friday) दिवस. गुरुवारच्या शेवटच्या भोजनानंतर आजच्याच दिवशी, शुक्रवारी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले होते. प्रभू येशूच्या त्यागाचा आणि बलिदानाचा हा एक काळा दिवस आहे. हा दिवस अतिशय शांततेत, जास्तीत जास्त काळ प्रार्थनेमध्ये, एकूणच अतिशय साधेपणाने व्यतीत केला जातो. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी चक्क या दिवसाच्या ‘आनंददायी शुभेच्छा’ दिल्या आहेत. ट्रंप यांनी आपल्या सोशल मिडीयावर सर्वांना ‘Happy Good Friday’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

डोनाल्ड ट्रंप ट्वीट -

गुड फ्रायडेचा दिवस हा ख्रिश्चनांमध्ये एक शोक दिवस, दुःखद दिवस म्हणून व्यतीत केला जातो. येशूने मानव जातीला दिलेल्या नि:स्‍वार्थ प्रेम आणि क्षमा या संदेशाचे आजच्या दिवशी स्‍मरण केले जाते. त्यामुळे ज्याप्रकारे आपण इतर सणांनिमित्त शुभेच्छा देताना जसे ‘Happy’ हा शब्द वापरतो, तो या गुड फ्रायडेच्या दिवशी कटाक्षाने टाळला जातो. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कहर करत चक्क या दिवसाच्या आनंदमयी शुभेच्छा दिल्या आहेत. डोनाल्ड ट्रंप यांच्या या ट्वीटनंतर अनेकांनी टीका करत ट्रंप यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

खचितच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फार मोठी चूक झाली आहे. मात्र एका ख्रिश्चन बहुल राष्ट्राच्या अध्यक्षांकडून अशी चूक अपेक्षित नाही. यामुळेच आता ट्रंप वापरकर्त्यांच्या टीकेचे आणि ट्रोलचे धनी बनले आहेत.

दरम्यान, कोणतीही चूक, कोणतेही पाप न केलेल्या परमेश्वराच्या पुत्राला सुळावर चढविले, मग हा शुक्रवार शुभ कसा? तर याचे उत्तर बायबलमध्येच सापडते. मृत्यूवर विजय मिळवून येशू पुनरुत्थानित झाला म्हणून शुक्रवारच्या या दिवसाला शुभ शुक्रवार म्हटले जाते, मात्र दुसरीकडेच त्याला क्रुसावर चढवण्यात आले या गोष्टीची दुःखद झालरही या दिवसाला आहे.