Pulwama Terror Attack: जम्मू काश्मीर येथील पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (United States President Donald Trump) आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. हा हल्ला अतिशय भयानक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुलावामा हल्ल्यातील अनेक रिपोर्ट्स हाती आले असून आम्ही त्याची तापसणी करत आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. भारताने युद्ध छेडल्यास जशास तसे उत्तर देऊ - इम्रान खान; पुलवामा हल्ल्याचे भारताचे आरोप फेटाळले
पुढे ते म्हणाले की, "मी अनेक रिपोर्ट्स पाहिले असून योग्य वेळी मी त्यावर प्रतिक्रीया देईल. हे दोन्हीही देश एकत्र आले तर फारच चांगले होईल. मात्र ही परिस्थिती फारच भयानक होती. यासंदर्भातील रिपोर्ट्स आम्हाला मिळत असून लवकरच आम्ही त्यावर आमचे मत मांडू."
US Pres Donald Trump on #PulwamaAttack: I've seen it, I've received a lot of reports on it. We'll have a comment at appropriate time. It would be wonderful if they got along. It seems like that was a horrible situation. But we're getting reports, we'll have a statement to put out pic.twitter.com/cOUQEKpMJh
— ANI (@ANI) February 20, 2019
त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पूर्ण समर्थन दिले असून हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करण्याचे पाकिस्तानला सांगितले आहे, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता रॉबर्ट पालाडिने यांनी दिली.
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. यात पाकिस्तानच्या जैन-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा हात होता. त्यानंतर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतावाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले असून हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला.